माऊलींचे पालखी सोहळ्याचे नामजयघोषात आळंदी मंदिरातून प्रस्थान

आळंदी ( मल्हारभाऊकाळे) : लाखो भावीकांचे उपस्थितीत प्रभावी पोलीस बंदोबस्तात संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याच्या पायी वारीचे प्रस्थान हरिनाम गजरात माउली मंदिरातील विना मंडपातून रविवारी ( दि.११ ) सायंकाळी पाऊण सात च्या सुमारास झाले. उद्या सोमवारी ( दि.१२ ) श्रींहा पालखी सोहळा गांधी वाड्यातील आजोळघरी गांधी परिवारातर्फे पाहुणचार घेत पुण्यातील दोन दिवसांचे मुक्कामास भल्या पहाटे प्रयाण होणार आहे. प्रस्थानला लाखो वारकरी भाविकांची गर्दी झाली. पोलीस बंदोबस्त तैनात होता. वारकरी, भाविकांचे उपस्थितीत श्रींचे पालखी सोहळ्याचे प्रस्थान झाले.

देवस्थानने प्रस्थान सोहळा थेट प्रक्षेपण सोय केल्याने मोठी पर्वणी भाविक,नागरिकांना लाभली. घरी राहून सुरक्षित पणे आनंदवारी सोहळ्याचा आनंद घेतला. दिंडीकरी आणि खांदेकरी यांचे मंदिर प्रवेशाचे संख्येवर नियंत्रण आणल्याने ग्रामस्थ आणि दिंडीतील वारकरी यांच्यात नाराजी होती. मंदिरात प्रवेश लवकर मिळावा यासाठी घाई करीत वारकरी प्रवेशण्यास आले. या कारणावरून पोलीस आणि वारकरी यांच्यात बाचाबाची झाली. यावेळी पोलिसांनी गर्दीवर नियंत्रण मिळविण्यास परिश्रम घेतले. वारकरी यांनी सुरक्षा कठडे ओलांडून प्रवेश करण्याचा प्रयत्न केला. या प्रसंगी थोडासा वाद निर्माण झाला. वेळेत सोहळा व्हावा यासाठी सर्व प्रशासनाने नियोजन केल्याने सोहळ्याचे प्रस्थान वेळेत होण्यास मदत झाली.   प्रस्थान दिनी माउली मंदिरात पुणे जिल्हा सत्र न्यायाधिश मच्छिंद्र चांडक, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, पुणे पालक मंत्री चंद्रकांत दादा पाटील, खासदार अमोल कोल्हे, संजय उर्फ बंडू जाधव, श्रीरंग बारणे, आमदार श्रीकांत भारतीय, आमदार रोहित पवार, माजी आमदार उल्हास पवार, माजी मंत्री, संजय उर्फ बाळा भेगडे, तुषार भोसले, डॉ. राम गावडे पाटील, राहुल चव्हाण, मुख्याधिकारी कैलास केंद्रे, उर्जितसिंह शितोळै सरकार, महादजी शितोळे, पालखी सोहळा प्रमुख अँड विकास ढगे पाटील, माजी विश्वस्त सुधीर पिंपळे, डॉ. प्रशांत सुरु, पालखी सोहळा मालक बाळासाहेब आरफळकर,राजेंद्र आरफळकर, प्रमुख विश्वस्त योगेश देसाई, माजी विश्वस्त डॉ.अभय टिळक, आळदी नगरपरिषद प्रशासक तथा खेड तहसीलदार वैशाली वाघमारे, खेडचे प्रांत गोविंद शिंदे पोलीस उपायुक्त, वरीष्ठ पोलीस निरीक्षक सुनील गोडसे, सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रकाश जाधव, रमेश पाटील, पोलीस निरीक्षक दिलीप शिंदे, श्रींचे सेवक चोपदार बाळासाहेब रणदिवे, राजाभाऊ रंधवे,रामभाऊ चोपदार, मानकरी बाळासाहेब कु-हाडे, योगेश आरु, स्वप्नील कु-हाडे, मंडलाधिकारी स्मिता जोशी, तलाठी , फडकरी, दिंंडीकरी, मानकरी यांचे उपस्थितीत झाले.
 आळंदी संस्थान तर्फे प्रस्थान सोहळ्याचे थेट प्रक्षेपण करण्यात आले. यामुळे भाविकांची सोहळा पाहण्यास सोय झाली. अनेकांनी घरी राहून सोहळ्याचा अनुभव घेतला. सोहळ्यास गर्दी वाढेल या शक्यतेने मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. स्थानिक नागरिकांना रहदारीला गैरसोय झाल्याने अनेकांनी नाराजी व्यक्त केली. प्रशासनाने पुरेशी दक्षता व काळजी घेत महसूल व पोलीस प्रशासनाने नियोजन करून आळंदी देवस्थान सोहळ्यातील संबंधित घटकांना विश्वासात घेऊन प्रस्थान पार पडले.
प्रशासनास आळंदीकर नागरिक व भाविकांनी ही मोठा प्रतिसाद दिल्याने गर्दीवर नियंत्रण मिळविता आले. यासाठी पोलीस प्रशासनाने शहरात चोख बंदोबस्त लावला. यासाठी वाहतूक पोलीस निरीक्षक शहाजी पवार यांनी प्रभावी नियोजन केले. मात्र काही वारकरी आणि स्वकं सेवक यांना सेवेच्या कार्यकाळात पोलीस प्रशासनाने गैरसोयीची वागणूक दिल्याने सेवकांमध्ये नाराजी राहिल्याचे अध्यक्ष सुनील तापकीर यांनी सांगितले.  
 अलंकापुरीत प्रस्थान सोहळ्या पूर्वी परंपरांचे पालन करीत विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यात मंदिरात पहाटे काकडा आरती, पवमान अभिषेक झाला. मंदिरात भाविकांना दर्शनास दुपार पर्यंत सोय करण्यात आली होती. श्रींचे संजीवन समाधी दर्शनास भाविकांनी गर्दी केली.
 दरम्यान नऊ वाजता वीणा मंडपात परंपरेने कीर्तन सेवा झाली. दुपारी परंपरेने मंदिरात श्रीनां महानैवेद्य झाला. मंदिरात सेवेकरी व स्वकाम सेवक यांनी स्वच्छता स्वयंसेवक यांचे माध्यमातून सेवा रुजू केली. मंदिर प्राकार व श्रींचा गाभारा प्रस्थानपूर्व स्वच्छ करण्यात आला. सेवाभावीवृत्तीने सेवकांनी आपली सेवा रुजू केली.  
 पालखी पायी वारी सोहळा असल्याने सोहळ्यातील इतर कार्यक्रम हरिनाम गजरात झाले. सोहळ्यास यावर्षी परंपरेने सुरुवात झाली. दरवर्षी प्रस्थान दिनी दुपारी दोन ते तीनच्या सुमारास श्रींचे रथापुढील आणि रथामागील मानाच्या ४७ दिंड्यांना देऊळवाड्यात सोहळ्यातील परंपरे प्रमाणे चोपदार यांचे सूचनां प्रमाणे महाद्वारातून प्रवेश देण्यात आला. यावर्षी दिंड्या व संबंधित दिंडी प्रमुख, वारकरी  घटकांचे स्थानिक प्रतिनिधी यांना देखील प्रवेश देण्यात आला. दरम्यान श्रींचे मंदिरात माउलींच्या समाधीवर ब्रह्मवृंदाच्या वतीने श्रीनां वैभवी पोशाख झाल्यावर श्री गुरू हैबतरावबाबांच्या वतीने माउलींच्या समाधीची परंपरेने आरती हरिनाम गजरात झाली. त्यानंतर माउली संस्थांन तर्फे श्रींची आरती झाली. दरम्यान श्रींचे वैभवी चांदीचे पादुका प्रस्थानासाठी पुष्पसजावटीने सजलेल्या चौथ-या वर वीणा मंडपात ठेवण्यात आल्या. श्रींचे चलपादुकांची विधिवत प्राणप्रतिष्ठापना झाली. या वेळी सोहळ्यातील नियमा प्रमाणे आळंदी संस्थानच्या वतीने मानकऱ्यांना पागोटे वाटप, श्रीगुरू हैबतरावबाबांच्या वतीने दिंडी प्रमुखांना पालखी सोहळ्याचे मालक राजेंद्र आरफळकर,बाळासाहेब आरफळकर यांचे हस्ते नारळ प्रसाद वाटप झाले. श्रींचे संजीवन समाधी गाभाऱ्यात आळंदी देवस्थान च्या वतीने परंपरेने मानकरी यांना नारळ प्रसाद देण्यात आला.परंपरेने धार्मिक उपक्रम होताच श्रींचे चलपादुका देवस्थान तर्फे पालखी सोहळ्याचे मालक राजेंद्र व बाळासाहेब आरफळकर यांचे कडे देण्यात आल्या. मालक आरफळकर यांचे नियंत्रणात श्रींचे पादुका पालखीतून मंदिर प्रदक्षिणा हरिनाम गजरात झाली. श्रींचे वैभवी चलपादुका मालकांकडे हरिनाम गजर करीत पालखीत विधिवत पूजा झाली. श्रींची पालखी आळंदीकर ग्रामस्थ यांनी माऊली माऊली असा नामजयघोष करीत खांद्यावर उचलीत वारीला जाण्यास वीणा मंडपातून सायंकाळी पंढरी कडे प्रस्थान ठेवले.
  माऊलींचे पादुकां पालखीची हरिनाम गजरात मंदिर प्रदक्षिणा झाल्यानंतर श्रींचे पादुका पालखी सोहळा आजोळघरा लगतच्या जुन्या रामवाड्याचे गांधी वाड्यात दर्शनबारी सभागृहात हरिनाम गजरात आणण्यात आल्या. येथे सोहळ्यातील परंपरांचे पालन करीत समाज आरतीने श्रींचा सोहळा विसावला. आळंदीत यावर्षी पहिला एक मुक्काम होत श्रींची पालखी पुढील दोन दिवसांचे मुक्कामासाठी पुण्यनगरीकडे सोमवारी ( दि. १२ ) मार्गस्थ होईल.
  पायी वारी असल्याने लाखो भाविकांची सोहळ्यास उपस्थिती राहिली. आळंदी देवस्थान ने श्रींचे सोहळ्याचे थेट प्रक्षेपण व्यवस्था केल्याने घरी राहून लाखो नागरिकांना सोहळा पाहता आला. यावर्षी श्रींचे पालखीची मंदिर प्रदक्षिणा, ग्राम प्रदक्षिणा हरिनाम जय घोषित झाली. आळंदी मंदिरात लक्षवेधी पुष्प सजावट व आकर्षक रंगावली, मंदिरात व इंद्रायणी नदी घाटावर लक्षवेधी विद्युत रोषणाई करण्यात आली. नदी घाटावर देहू आळंदी विकास समितीचे वतीने विविध लोकशिक्षणपर कार्यक्रम झाले. विद्युत रोषणाईने भाविकांची मने जिकली. थेट प्रक्षेपण असल्याने नागरिकांनी घरात राहून पालखी सोहळ्याचा आनंद लुटला. आळंदी मंदिरात लक्षवेधी पुष्पसजावत आणि परिसरातील रंगवली भाविकांची दाद मिळवली. आळंदी पंचक्रोशीत थिठिकाणी सामाजिक उपक्रम झाले. यात अन्नदान मोठा प्रमाणात झाले. आळंदीतील स्वकाम सेवा मंडळाने त्यांचे सेवकांना सेवा करताना रोखण्यात आले. वर्षभर सेवा करून देखील प्रस्थानकाळात पोलीस प्रशासनाने सेवकांना बाहेर काढल्याने अध्यक्ष सुनील तापकीर यांनी नाराजी व्यक्त करीत प्रशासनाचा निषेध केला. यावेळी जिल्हाधिकारी आणि जिल्हा न्यायाधीश यांनी श्रींचे पालखी सोहळ्याचे प्रत्येक्ष दर्शी होत सोहळा अनुभवाला. यावेळी थेट छायाचित्र घेत आनंदवारी मध्ये आनंद घेतला. यावर्षी पावसाने मात्र दडी दिली.
× How can I help you?