बोपोडी : आठशे वर्षां पासून वारकरी संप्रदायाची पताका नियमितपणे चालू आहे त्याचाच प्रत्यय आज अनुभवयास मिळाला. पुणे महानगर पालिकेचे प्रवेश द्वार असलेल्या बोपोडी गावात जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे स्वागत बोपोडी करांच्या वतीने फुले वाहून आणि वारकऱ्यांची सेवा करीत मोठ्या आनंदात आणि उत्साहात करण्यात आले.महाविकास आघाडी आणि वि. भा. ज्ञानपीठ च्या वतीने पालखी सोहळ्यातील वारकऱ्यांना मोफत प्रथमोपचार पेटी आणि वारकऱ्यांची डॉ. ढोबळे आणि त्यांची टीम च्या वतीने आरोग्य तपासणी करण्यात आली. या प्रसंगी ज्ञानपीठाचे अध्यक्ष आणि माजी नगरसेवक श्रीकांतजी पाटील यांच्या हस्ते वारकऱ्यांना मोफत प्रथमोपचार पेटी चे वाटप करण्यात आले