स्व.लक्ष्मण जाधव यांच्या स्मरणार्थ वारकऱ्यांना मोफत ओषध पेटी वाटप

बोपोडी : दत्ता सूर्यवंशी. जगद्गुरू  संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे बोपोडीत स्वागत करून रुग्ण सेवा समितीच्या वतीने स्व. लक्ष्मण बापूराव जाधव यांच्या स्मरणार्थ युवक अध्यक्ष विशाल जाधव यांच्या मुख्य आयोजनाने वारकऱ्यांना औषध पेटी आणि पाणी वाटप करण्यात आले तसेच भक्तिमय गीतांच्या मनोरंजनाच्या कार्यक्रमाचे उदघाट्न डी वाय एस पी अनिल पवार यांच्या हस्ते करण्यात आले

. या प्रसंगी लोकप्रिय गायक श्रीकांत खडके, प्रकाश गवळी, शाम चंदनशिव, बापू  ननावरे, विजय कलपे, निशांत गायकवाड, गीतांजली केळकर, विजय कुऱ्हाडे, संध्या कुऱ्हाडे, कविता तरडे फुगे, मनीषा गाडे, इत्यादी गायकांनी आपल्या बहारदार आवाजात भक्तिमय गीते गाउन वारकऱ्यांची सेवा केली. या वेळी माजी नगरसेवक श्रीकांतजी पाटील, जेष्ठ उद्योजक कृष्णकुमार गोयल, मा. नगरसेवक संभाजी शिंदे, राजेंद्र भुतडा,आनंद छाजेड, शैलेजाताई खेडेकर, प्रशांत शितोळे, ऍड. नंदलाल धीवार, विभागीय आरोग्य निरीक्षक विजय भोईर, औंध वार्ड ऑफिसर संदीप खलाटे, विनोद रणपीसे, अनिल भिसे, करीमलाला शेख, अर्चना छाजेड, सुंदरताई ओव्हाळ, मनीषा ओव्हाळ, शोभा आरुडे, अमित जावीर, ऍड. विठ्ठल आरुडे, विजय जगताप, विनोद सोनवणे, इत्यादी उपस्थित होते.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी श्रीकांत जगताप, बाबा तांबोळी, अँथोन अण्णा, निलेश मोरे, सुनील थोरात, वकार शेख. डोम्यानिक स्याम, मुकेश कांबळे, अली शेख यांनी विशेष परिश्रम घेतले.

Recent Post

× How can I help you?