आळंदीत मोफत आरोग्य तपासणी औषध वाटप

आळंदी ( मल्हारभाऊ काळे) : संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्या अंतर्गत आषाढी वारी निमित्त अविरत आमुची पाऊले चालती, जनसेवेची ध्येयपूर्ती या उक्ती प्रमाणे आळंदीत आलेल्या वारकरी बांधवांना महाराष्ट्र नवनिर्माण सेना आळंदी शहराच्या वतीने मोफत आरोग्य तपासणी व औषध वाटप उत्साहात करण्यात आले

या वेळी मोठ्या संख्येने भाविकांनी या आरोग्य सेवेस प्रतिसाद देत लाभ घेतला आहे. या प्रसंगी सर्व पदाधिकारी व महाराष्ट्र सैनिक उपस्थित होते. उपक्रमाचे संयोजन आळंदी शहर मनसे शहराध्यक्ष अजय उर्फ ज्ञानेश्वर सुरेश तापकीर यांनी केले. वारकरी भाविकांचा आरोग्याची काळजी घेण्यासाठी या शिबिराचे आयोजन करण्यात आल्याचे शहराध्यक्ष अजय तापकीर यांनी सांगितले.

Recent Post

× How can I help you?