माणूस हा आजन्म शिकत असतो. त्याला वयाचे किंवा कुणाच्याही टीका टिप्पणीची गरज नसते. असे अध्यक्षीय भाषणात गझलकार उद्धव महाजन बिस्मिल बोलत होते.
साहित्य सम्राटचे १६७ वे कविसंमेलन संस्थापक अध्यक्ष विनोदजी अष्टुळ यांनी लोहिया उद्यान हडपसर येथे आयोजित केले होते. साहित्य सम्राट ही संस्था अनेक जेष्ठ साहित्यिक आणि विचारवंतांनी गौरवलेली संस्था आहे. हि संस्था साहित्यिक, साहित्य आणि संस्था निर्माण करण्याचे महान कार्य करीत आहे. प्रत्येक साहित्यिक हा संघटक असून त्यांच्या सोबत एकतरी साहित्यिक नेहमी असला पाहिजे. असे अष्टुळ प्रास्तविक करताना बोलत होते.
यावेळी कविसंमेलनात नामवंत कवींनी आपल्या गझल आणि कविता सादर करून बागेतील काव्य रसिकांची दाद मिळवली. यामध्ये गझलकार मसूद पटेल, सचिन कांबळे, ताराचंद आटोळे, चंद्रशेखर हाडके, किशोर टिळेकर, रामदास शेळके, अनिल सुर्यवंशी, गौरव नेवसे, विश्राम यशोद, देवेंद्र गावंडे, आश्विन गावंडे, आनंद महाजन, उद्धव महाजन, सीताराम नरके, शरयू पवार आणि विनोद अष्टुळ यांनी सहभाग घेतला. प्रत्येक कवितेतील आशय,विषय आणि सौंदर्य कार्यक्रमाच्या सूत्रसंचालनामध्ये आनंद महाजन यांनी तर शरयू पवार यांनी साहित्य सम्राट आपल्या हक्काचे आणि माहेर आहे हा अनुभव कवी कवयित्रींनी कोणत्याही व्यासपीठावरून आवर्जून सांगितला पाहिजे. असे विचार आभारात व्यक्त केले.