लेखक प्रविण खोलंबे. यांना महाकवी कालिदास पुरस्कार जाहीर.

पुणे – साहित्य,कला, शिक्षण सांस्कृतिक क्षेत्रात कार्यरत असलेली पुण्यातील महाकवी कालिदास प्रतिष्ठान, पुणे संस्था या संस्थेच्या वतीने देण्यात येणारा या वर्षीचा ” महाकवी कालिदास पुरस्कार” मुरबाड तालुक्यातील रहिवासी असलेले प्रसिद्ध लेखक कवी प्रविण खोलंबे. यांना जाहीर झाला आहे

महाकवी कालिदास प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्री.वि.ग.सातपुते, शिक्षणतज्ज्ञ डॉ.न.म.जोशी.यांच्या उपस्थित सोमवार दि.१९ जुन २०२३ रोजी महाकवी कालिदास दिनाचे औचित्य साधून पुणे येथील धारेश्वर विद्या व क्रीडा प्रतिष्ठान सभागृह येथे होणाऱ्या कार्यक्रमात गोवा राज्याचे माजी उपसभापती मा.शंभुभाऊ बांदेकर.साहेब यांच्या हस्ते साहित्यिक प्रविण खोलंबे यांना “महाकवी कालिदास पुरस्कार” सन्मानपूर्वक प्रदान करण्यात येणार आहे.
× How can I help you?