श्री.ज्ञानेश्वर शिक्षण संस्था संचलित ज्ञानेश्वर प्राथमिक विद्यामंदिर व ज्ञानेश्वर विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय नवगतांचे स्वागत समारंभ

वार्ताहर मल्हार भाऊ काळे :मोफत पाठ्यपुस्तक वाटप व सन दोन हजार बावीस 23 या शैक्षणिक वर्षात शंभर टक्के उपस्थित राहणाऱ्या 16 विद्यार्थ्यांचा सन्मान सोहळा उत्साहात पार पडला विद्यार्थ्यांचे संस्थेच्या व प्रशालेच्या सर्व घटकांच्या वतीने ढोल पथकाच्या गजरात फुलांची उधळण करत पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले

यावेळी शासनाच्या वतीने देण्यात आलेल्या पहिले ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तक वाटप करण्यात आले याप्रसंगी संस्थेचे सचिव अजित वडगावकर विश्वस्त प्रकाश काळे रमेश नवलाखा पुष्पा कुराडे विद्यालयाचे प्राचार्य दीपक मुंगसे उप प्राचार्य सूर्यकांत मुंगसे प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक प्रदीप काळे पर्यवेक्षक किसन राठोड प्रशांत सोनवणे अनिता गावडे यासह सर्व शिक्षक शिक्षिका शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते प्रास्ताविक मुख्याध्यापक प्रदीप काळे यांनी केले
सूत्रसंचालन राहुल चव्हाण यांनी तर वैशाली शेळके यांनी आभार मानले

Recent Post

× How can I help you?