खडकी शिक्षण संस्थेच्या पी.पी.एम.बाल शिक्षण मंदिर येथे बाल विदयार्थ्यांचा शाळेचा प्रवेश दिन एका अनोख्या उपक्रमा द्वारे साजरा करण्यात आला. शाळा वर्ग प्रवेश करताना प्रत्येक बालकांच्या पावलांचे ठसे एका कोऱ्या पानावर घेऊन त्यावर त्यांचे नाव लिहून संस्थेचे अध्यक्ष कृष्णकुमार गोयलजी यांच्या हस्ते त्यांच्या पालकांना एक आगळी वेगळी अनमोल भेट देण्यात आली. गोयल साहेबांच्या हस्ते सरस्वतीचे पूजन करून या अनोख्या उपक्रमाची सुरुवात करण्यात आली.