नांदेड :अक्षय भालेराव खून प्रकरणात आयुक्तांचे जिल्हाधिकाऱ्यांना विशेष बैठक बोलवण्याचे आदेश….
वैभव गितेंच्या निवेदनाची गंभीर दखल घेत जिल्हाधिकाऱ्यांसह पोलीस अधीक्षकांना सूचना

नांदेड जिल्ह्यातील बोंडार हवेली या गावात डॉ.बाबासाहेब आंबेडकरांची जयंती साजरी केली म्हणून अक्षय भालेराव यांची निर्घृण हत्या झाल्याने उर्वरीत आरोपींना अटक होण्यासाठी आरोपींना फाशीची शिक्षा होण्यासाठी तात्काळ कारवाई करण्यासाठी नॅशनल दलित मुव्हमेंट फॉर जस्टीस (एन.डी.एम.जे) या संघटनेचे राज्य महासचिव ऍड.डॉ.केवल उके यांच्या मार्गदर्शनात राज्य सचिव वैभव गिते यांनी मंत्रालयात सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचे सचिव सुमंत भांगे याची भेट घेऊन चर्चा करून निवेदन दिले होते.

वैभव गिते यांनी अक्षय भालेराव हत्या प्रकरणी चालू असलेला तपासावर आक्षेप घेत तपास गुणवत्तेच्या आधारावर होण्यासाठी 1 ते 31 कायदेशीर मुद्यांचे निवेदन दिले.महाराष्ट्र शासनाने याची गंभीर दखल घेऊन अपर मुख्य सचिव गृह विभाग,पोलीस महासंचालक,आयुक्त समाजकल्याण पुणे,जिल्हाधिकारी नांदेड,विशेष पोलीस महानिरीक्षक नांदेड,पोलीस अधीक्षक नांदेड यांना कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
शासनाने दिलेल्या पत्रात असे म्हंटले आहे की वैभव गिते यांनी दिलेल्या पत्रातील मुद्दे गंभीर स्वरूपाचे असून सदर मुद्यांच्या अनुषंगाने नियमानुसार उचित कार्यवाही करावी.तसेच सदर प्रकरण गंभीर असल्याने आवश्यक त्या प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्यात असे शासनाने पत्रात लिहले आहे.
शासनाचे पत्र आयुक्त समाजकल्याण पुणे यांना प्राप्त होताच डॉ.प्रशांत नारनवरे आयुक्त समाजकल्याण पुणे यांनी दि.16-6-2023 रोजी ईमेलद्वारे जिल्हाधिकारी अभिजीत राऊत व पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे नांदेड यांना जिल्हाधिकारी यांच्या अंतर्गत जिल्हा दक्षता व नियंत्रण समितीची बैठक विशेष बाब म्हणून आयोजित करून आवश्यक त्या प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यासंदर्भात संबंधित यंत्रणांना आदेशित करावे.तसेच निवेदनामधील मुद्यांवर उचीत कार्यवाही करण्यात यावी.सदर बाबीस प्रथम प्राधान्य देण्यात यावे.असे आदेश आयुक्त समाजकल्याण पुणे डॉ.प्रशांत नारनवरे यांनी जिल्हाधिकारी अभिजीत राऊत व पोलिस अधीक्षक यांना दिले व त्याची एक प्रत कार्यवाहीस्तव विशेष पोलीस महानरीक्षक नांदेड परिक्षेत्र यांना पाठवण्यात आली आहे.अशी माहिती नॅशनल दलित मुव्हमेंट फॉर जस्टीस (एन.डी.एम.जे) या संघटनेचे राज्य सचिव वैभव गिते
सहसचिव पी.एस.खंदारे,राज्य कोषाध्यक्ष शिवराम कांबळे,राज्य संघटक पंचशीला कुंभारकर यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना दिली आहे.

Recent Post

× How can I help you?