हडपसर पोलिसांची धडाकेबाज कारवाई खुनाच्या गुन्हातील आरोपी टोळक्यास 48 तासात अटक*

*प्रतिनिधी :- जब्बार मुलाणी पुणे:हडपसर – फुरसुंगी:
दि. १६/०६/२०२३ रोजी रात्रौ ०१.५० वा. चे सुमारास फिर्यादी शिवलींग ज्ञानदेव पांढरे व मयत वैभव विठ्ठल गायकवाड हे अॅक्टीवा गाडीवरून मिठाचे गोडावून पाठीमागे फुरसुंगी रोडने जात असताना गाडीमागुन आलेल्या दोन मोटार सायकल वरील ५ आरोपी यांनी वैभव गायकवाड याचे मानेवर, गळयावर, तोंडावर, डोक्यावर, छातीवर हातावर धारदार हत्याराने सपासप वार करुन व लाकडी दांडक्याने मारुन वैभव गायकवाड याला जीवे ठार मारले.

हडपसर पोलीस ठाणे येथे गु.र.नं ८८९ / २०२३ भा.दं.वि. कलम ३०२,१४३, १४४, १४७, १४९, महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम ३७ (१) सह १३५, भारतीय हत्यार कायदा कलम 8(24) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गुन्ह्यातील आरोपी गुन्हा झालेनंतर फरार झाले होते. उपयुक्त माहीती तांत्रिक विश्लेषणा द्वारे गोळा करून आरोपींचा पाठलाग करत आरोपी १) प्रतिक पोपट कामठे वय २४ वर्ष रा. बेंदवाडी फुरसुंगी पुणे. २) शुभम सुधाकर गायकवाड वय २१ वर्ष रा. सदर ३) आशितोष ऊर्फ सोन्या शरद पोटे वय २१ वर्ष रा. जैननगर फुरसुंगी पुणे. ४) स्वराज सुनील दोरगे वय १९ वर्ष रा. बेंदवाडी फुरसुंगी पुणे. ५) अनिकेत ज्ञानेश्वर कटके वय १९ वर्ष रा. बेंदवाडी फुरसुंगी पुणे. यांना बोरीबेल दौंड येथून ताब्यात घेतले. आरोपींना हडपसर पोलीस ठाणेस घेवून येवून त्यांचेकडे तपास करता त्यांनी मयत वैभव गायकवाड याचेबरोबर ऊरूसामध्ये झालेल्या भांडणाचा राग मनात धरून खुन केला असल्याचे सांगीतले. पुढील तपास प्रतापसिंह शेळके, पोलीस उप निरीक्षक हडपसर पोलीस स्टेशन हे करीत आहेत.
× How can I help you?