पुणे 20, जून :साहित्य,कला,शिक्षण, सांस्कृतिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारी पुण्यातील प्रसिद्ध संस्था महाकवी कालिदास प्रतिष्ठान, पुणे होय.या संस्थेच्या वतीने देण्यात येणारा या वर्षीचा महाकवी कालिदास पुरस्कार प्रसिद्ध लेखक कवी प्रविण खोलंबे यांना प्रदान करण्यात आला आहे.
मुरबाड तालुक्यातील रहिवासी असलेले प्रसिद्ध लेखक कवी प्रविण खोलंबे.हे साहित्य, सांस्कृतिक व सामाजिक विषयांवर सातत्याने लेखन करत आहेत. आतापर्यंत त्यांनी विविध विषयांवर २०० हुन अधिक लेख लिहिले आहेत. तर १००० हुन अधिक काव्यलेखन केले आहे. नाशिक आकाशवाणी केंद्रावरुन त्यांच्या कविता प्रसारित झाल्या आहेत. तर जळगाव आकाशवाणी केंद्र व पुणेरी रेडिओ आवाजात त्यांच्या कविता अभिवाचन करण्यात आल्या आहेत. त्यांच्या साहित्य व सांस्कृतिक क्षेत्रातील योगदानाबद्दल त्यांना राष्ट्रीय व राज्यस्तरीय पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे.महाराष्ट्रातील अनेक मराठी साहित्य संस्थांचे ते प्रतिनिधी असुन.मराठी भाषा साहित्य, जतन व संवर्धनासाठी समाज प्रबोधन क्रांती जनजागृतीसाठी ते सातत्याने लेखन करत असतात.