संविधान आणि आपला देश वाचविण्या साठी आपण सर्वांनी मिळून काम केले पाहिजे. मा.आमदार दीप्तीताई चवधरी.

बोपोडी: खूप अडचणीचा गेली दहा वर्षाचा काळ काँग्रेस ने पाहिला आहे. देश आणि संविधान वाचविण्यासाठी राहुलजी गांधी निर्धाराने लढत असून आपण त्यांच्या पाठीशी भक्कम पणे उभे राहून देश आणि संविधान वाचविण्यासाठी आपण सर्वानी मिळून काम केले पाहिजे असे आव्हाहन माजी आमदार दीप्तीताई चवधरी यांनी व्यक्त केले

बोपोडी महा आघाडी च्या वतीने पुण्याच्या माजी महापौर मा. आमदार दीप्तीताई चवधरी यांच्या वाढदिवसा निम्मित अभिष्टचिंतन सोहळा बोपोडी काँग्रेस कार्यालयात आयोजित करण्यात आला होता त्या वेळी त्या बोलत होत्या. या प्रसंगी शुभेच्छा देताना डी वाय एस पी अनिल पवार, ब्लॉक अध्यक्ष राजेंद्र भुतडा, प्रवक्ते ऍड. रमेश पवळे ,
माजी नगरसेवक ऍड. नंदलाल धीवार कार्यक्रमाच्या आयोजिका अनुसूचीत जाती जमाती पुणे शहर अध्यक्षा सुंदरताई ओव्हाळ, राष्ट्रवादी काँग्रेस पुणे शहर सर चिटणीस विजय जाधव, काँग्रेस जेष्ठ नेते इंद्रजित भालेराव, चिटणीस शशिकांत पांडुळे यांच्या संयुक्त विद्यमाने केक कापून वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
या वेळी काँग्रेसची बुलंद तोफ सत्तारभाई मिस्त्री, मा. युवक अध्यक्ष विशाल जाधव, काँग्रेसचे मैनुउद्दीन अत्तार, ऍड. विठ्ठल आरुडे, मयुरेश गायकवाड,काँग्रेस जेष्ठ नेत्या कमलबाई गायकवाड, अरुणाताई चेमटे, वॉर्ड अध्यक्षा कांताताई ढोणे, अध्यक्षा शोभाताई आरुडे, मनीषा ओव्हाळ,अख्तरी शेख, विमल खांडेकर, आमलू अक्का, कल्पना शंभरकर, करीम तुर्क,मिलिंद माने इत्यादी उपस्थित होते.

Recent Post

× How can I help you?