आळंदी ( मल्हारभाऊकाळे) : प्राथमिक आरोग्य केंद्र ,कडूस येथे डेंग्यू सदृश्य रुग्ण आढळून आल्याने आरोग्य विभागाcमार्फत सर्वेक्षण सुरू करण्यात आले आहे. तालुका आरोग्य कार्यालय खेड यांचे मार्फत प्राथमिक आरोग्य केंद्र कडूस आणि राजगुरुनगर येथील कर्मचारी यांची पथके तयार करून पाठविण्यात आली आहेत. चांडोली, कडूस येथील घरांचे सर्वेक्षण सुरू करण्यात आले आहे. प्रत्येक घरातील पाण्याने भरलेली भांडी,कुंड्या, फ्रिज , हौद यांची पाहणी करून त्यातील डास अळ्या नष्ट करण्यात येत आहेत.