हभप सखाराम सिताराम जेठे महाराज यांचे बद्रीनाथ धाम (उत्तराखंड) येथे निधन

अहमदनगर :- नगर तालुक्यातील देहरे येथील प्रतिष्ठीत हभप सखाराम महाराज जेठे (वयवर्षे ८६) यांचे उत्तराखंड येथील बद्रीनाथ धाम याठिकाणी दर्शनासाठी गेले असता भगवान श्री बद्रीनाथांचे दर्शन झाल्यानंतर तेथील भारत सेवा आश्रमात त्यांचे निधन झाले.
हभप जेठे महाराज यांचे या आधी पुर्वीच द्वारका,जगन्नाथपूरी, रामेश्वरम या तिन्ही धामांचे दर्शन पुर्ण झाले होते, श्री बद्रिनाथ धाम हे त्यांचे चौथे दर्शन होते,

बालपणापासूनच त्यांना अध्यात्मिक क्षेत्राची आवड असल्याने त्यांनी संपूर्ण आयुष्य हे परमेश्वर भक्तींसह सत्य,परोपकार आणि निर्पेक्षता यातच व्यथित केले, त्यांनी तीन लक्ष एकावन्न हजार राम नाम जप करून स्वहस्ताक्षरात आपल्या वहीमध्ये नोंदविले आहे.तसेच समाज प्रबोधनात्मक जवळपास अडीचशे कविता,गवळणी,आणि काही ओव्या तथा अभंग देखील लिहिले आहेत, त्याचप्रमाणे महाराष्ट्रातील ३५० पेक्षा अधिक प्राथमिक, माध्यमिक शाळांना प्रत्यक्ष भेटी देऊन स्वच्छता अभियान, नद्यांची स्वच्छता, देशभिमान,आई-वडीलांची सेवा, देशसेवा,सुसंस्कारीत कसे घडावे या विषयी प्रबोधन केल्यानंतर ३५० शाळांनी त्यांना सही शिक्यासह प्रमाणपत्र दिले आहेत. हे त्यांच्या निर्पेक्ष समाजसेवेचे वैशिष्ट्ये आहे.
त्यांचे पश्चात तीन मुले,तीन मुली,तीन सुना,दोन जावई,नातवंडे असा मोठा परिवार आहे.
शिर्डी एक्सप्रेस चे संपादक श्री. रमेश सखाराम जेठे,गणेश जेठे व महसुल मंडळ अधिकारी सुरेश जेठे यांचे ते वडील होत.
× How can I help you?