१० वी व १२ वी गुणगौरव कार्यक्रम संपन्न

डॉ.बाबासाहेब आंबेडकर ग्रंथालय व सेंटर फॉर युथ डेव्हलपमेंट ऍण्ड ऍक्टिव्हिटी ( CYDA ) या संस्थेच्या संयुक्त विद्यमाने अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतुन १० वी व १२ वीच्या परीक्षेमध्ये ६० टक्क्यापासून ते ९४ टक्क्यांपर्यंत गुण मिळवुन ताडिवाला रोड विभागाचे नाव पुणे शहरात उज्वल करणाऱ्या विद्यार्थी व विद्यार्थिनीचा सत्कार आयोजित करण्यात आला

सदर कार्यक्रमासाठी हेल्थ फॉर चिल्ड्रन फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष जॉर्ज वर्गीस,प्रवीण जाधव CYDA प्रोग्रॅम एक्सिकिटीव्ह,राजेंद्र एडके सर मुख्यध्यापक सजनाबाई भंडारी विद्यालय,प्रमोदिनी नाईक CYDA एक्सिकिटीव्ह मॅनेजर,) विठ्ठल गायकवाड( समन्वयक मातोश्री रमाबाई आंबेडकर स्मारक समिती, तौसिफ शेख,नामदेव डामसे सर,सचिन सुडगे, यांच्या प्रमुख उपस्थितीत शालेय साहित्य देऊन सत्कार करण्यात आला या वेळी जॉर्ज वर्गीस यांनी शुभेच्छा देताना सांगितले कि हे तळागाळातील विद्यार्थी उद्या देशाचे भविष्य ठरवू शकतात
या वेळी सर्व प्रमुख पाहुण्यांच्या सन्मान करण्यात आला. तसेच विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन CYDA च्या विद्यार्थ्यांनी केले कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ.बाबासाहेब आंबेडकर ग्रंथालयाचे सचिव सुजित अप्पा यादव यांनी केले तर कार्यक्रमाचे आयोजन CYDA ताडिवाला रोड CRC सेंटर च्या प्रमुख अमृता पवार व त्यांचे सर्व सहकारी तसेच डॉ बाबासाहेब आंबेडकर ग्रँथालयाचे संतोष हंगारगी, दयानंद तानवडे,संदीप कांबळे, दीपक मोरे,अभिषेक यादव, ईश्वर गायकवाड, महेश वाघमारे यांनी केले कार्यक्रमास विभागातील विद्यार्थी तसेच पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते त्यांना CYDA संस्थेने वर्षभर राबवलेल्या उपक्रमांची चित्रफीत दाखवण्यात आली
× How can I help you?