आळंदी ( मल्हारभाऊकाळे) : केंद्र सरकार देशात आणि राज्य शासन राज्यात अनेक लोकहिताच्या योजना आणि विविध विकासाची कामे राबवित आहे. यातून देशाचा विकास आणि प्रगती झाली असून या लोकोपयोगी योजना लोकांपर्यंत जनजागृतीच्या माध्यमातून मोदी@9 महाजनसंपर्क अभियान अंतर्गत पोहोचविण्याचे कार्य कार्यकर्त्यांनी प्रभावीपणे करण्याची गरज असल्याचे केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे पाटील यांनी सांगितले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात केंद्र सरकारला नऊ वर्षे पूर्ण झाल्या बद्दल भारतीय जनता पक्षाच्या वतीने देशात मोदी@9 महाजनसंपर्क अभियान सुरु करण्यात आले आहे. या उपक्रमातील कार्याचा भाग म्हंणून शिरूर लोकसभा मतदार संघात केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे पाटील यांची जाहीर सहा आळंदीत झाली. यावेळी ते बोलत होते.