आळंदी ( मल्हार भाऊ काळे) : येथील ग्रामदैवत श्री हजेरी मारुती उत्सव समिती , समस्त ग्रामस्थ आळंदीकर यांचे विशेष प्रयत्नातून तसेच देणगीदार, व्यक्ती, संस्था, भाविक यांचे सहकार्याने ग्रामदैवत श्री हजेरी मारुती मंदिराच्या सभामंडपाच्या स्लॅब टाकण्याचे कामाची सुरुवात श्रीफळ वाढवून उत्साहात करण्यात आली. तत्पूर्वी श्री हजेरी मारुती मुख्य मंदिर कळसासह श्रींचा गाभारा परिसराचे लक्षवेधी जिर्णोद्धाराचे काम पूर्ण करण्यात आल्याचे माजी नगराध्यक्ष राहुल चिताळकर पाटील यांनी सांगितले.