पुढील काळात कोल्हापूर सारख्या दंगली घडू नयेत म्हणून राजर्षी शाहू महाराजांचा शाहूवाद आपण जोपासला पाहिजे असे मत राष्ट्रमाता जिजाऊंचे वडील लखुजीराजे जाधव यांचे 16 वे वंशज मा.शिवाजी राजेजाधव यांनी व्यक्त केले राजर्षी शाहू महाराज जयंतीनिमित्त राजर्षी शाहू महाराज सोशल फाउंडेशनच्या माध्यमातून घेण्यात आलेल्या राजर्षी शाहू जन्मोत्सव कार्यक्रमात ते बोलत होते. राजर्षी शाहू महाराजांचे शिक्षणाचे कार्य खऱ्या अर्थाने शिष्यवृत्ती योजनेच्या माध्यमातून पुढे घेऊन जाणाऱ्या राजर्षी शाहू सोशल फाउंडेशनचे कार्य मोलाचे आहे असेही आपल्या मनोगतात म्हणाले.