कलाकार कट्ट्यावर शाहूंच्या आठवणींना उजाळा

विविध सांस्कृतिक कलाकृतींची रेलचेल असणाऱ्या कलाकार कट्यावर शाहू महाराजांच्या कार्याचा उजाळा करणारा पोवाडा, कथा यांचं सादरीकरण झालं. निमित्त होते राजर्षी शाहू महाराज यांच्या १४९ व्या जयंती बाबत अभिवादन कार्यक्रमाचा. हा कार्यक्रम २६ जूनला संध्या ६.३० वाजता कलाकार कट्यावर लोकायत संघटनेच्या सांस्कृतिक आघाडी काफिलाने सादर केला.

फासे पारधी समाज बांधवानाच्या पंगतीला मांडीला मांडी लावून बसणारे, कोणत्याही जाती पेक्षा अस्मितेपेक्षा पोटाचा प्रश्न मोठा आहे हे सांगणारे, जातीतील चुकीच्या प्रथांवर बोट ठेवणारे, हॉटेल काढून दिलेला पण पुढे जाऊन कोल्हापूरात दलित चळवळीचे नायक बनलेला गंगाराम कांबळे अशा शाहू महाराजांच्या कार्याच्या विविध कथा सांगण्यात आल्या.
आयुष्यभर सामाजिक समता प्रस्थापित करण्यासाठी आणि अस्पृश्य-बहुजन समाजाचा उद्धार करण्यासाठी ते प्राणपणाने लढणाऱ्या छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांच्या कार्याचा जागर करणे या उद्देशाने कार्यक्रम आयोजित केला असं मत लोकायतचे समन्वयक तुषार रईसा यांनी मांडले.
पुढे नेऊया शाहू कार्याला, त्यांच्या विचारांना, त्यांच्या न्यायाला…
मिळूनी हाक देऊ रयतेला,
एकीनं बांधू कष्टकऱ्यांना
उभारूया नव्या समाजाला जी जी जी या पोवाड्याने कार्यक्रमाची सांगता झाली. इतिहासाची पाने उजळवणाऱ्या, समतेची शिकवण देणाऱ्या या राजाच्या कर्तृत्वाची माहिती सांगणारे पत्रकही वाटण्यात आले. या कार्यक्रमाला तरुणाईचा उस्फुर्त प्रतिसाद लाभला. या उपक्रमा सोबतच लोकायत कडून एक दिवसीय वाचन शिबीर ही आयोजित करण्यात आले होते.
× How can I help you?