कवी विनोद अष्टुळ यांचा सहकार शिबिरात गौरव

साक्षर सक्षम सहकार अभियान यशस्वीपणे राबवणारे Sapact Pvt, Ltd ने सत्तांतर की स्थित्यंतर या विषयावरील संचालक प्रशिक्षण शिबिर बेसिलिका हॉटेल लोणावळा येथे आयोजित केले होते. यावेळी महाराष्ट्रातील नामांकित पतसंस्थांचे संचालक मोठ्या संख्येने हजर होते. पतसंस्थांची स्थिती, प्रगती, शिस्त आणि जबाबदारी अशा गोष्टी सकारात्मक कृतीने पार पाडण्याचे तंत्र उत्साही वातावरणात सर्वांना लाभले.

यावेळी साक्षर सक्षम सहकार अभियान यशस्वीपणे पूर्ण केल्याबद्दल संस्थेचे संस्थापक संचालक विनोद अष्टुळ यांना sapact चे कार्यकारी अधिकारी आदरणीय संदीपजी पाटील सर यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले.
याप्रसंगी भागीरथी पतसंस्थेचे चेअरमन प्रदीपशेठ गोगावले, शिवाजी डोंबे, गोरख शिंदे आणि संदीप डोंबाळे इ.संचालक उपस्थितीत होते.
× How can I help you?