अशी मने जिंकणाऱ्या कविता असाव्या. – सुवर्णा पवार

कविता कशा लिहाव्या, कशा शब्दबद्ध कराव्या, त्या सादर कशा कराव्या आणि कविसंमेलनाचे उत्कृष्ट निवेदन कसे करावे. हे आजच्या पिढीने साहित्य सम्राटच्या कवी कवयित्री कडून निश्चित ऐकले पाहिजे. नाहीतर इतर ठिकाणी हा बाबा कधी खाली बसतोय असे वाटत असते. असे मत अध्यक्षस्थानी असलेल्या मुंबईच्या जेष्ठ कवयित्री पवार यांनी व्यक्त केले.

साहित्य सम्राटचे १६९ वे कविसंमेलन निळकंठेश्वर महादेव मंदिर हडपसर येथे आषाढी एकादशी निमित्त आयोजित केले होते. प्रमुख अतिथी बारामतीचे जेष्ठ कवी शांतीलाल ननवरे, अशोक जाधव, जगदीप वनशिव आणि विनोद अष्टुळ विचारपीठावर उपस्थित होते.
या कविसंमेलनात साहित्य सम्राटच्या सुप्रसिद्ध बावीस कवींनी सहभाग घेतला होता. त्यामध्ये आदरणीय अशोक वाघमारे यांनी जगी वेगळी वारी, नात्यांना जोडणारी कविता. किशोर टिळेकर यांनी पाऊसाची विविध रूपे, प्रीतीचा फुलोरा. संजय भोरे यांनी पौर्णिमेच्या चंद्राचे सौंदर्य, राजकारण. अशोक शिंदे यांनी जिता जागता परमेश्वर, नात्यातील सख्खे. उध्दव महाजन यांनी जळी स्थळी तुच, व्यर्थ कथा सांगू कशाला. नानाभाऊ माळी यांनी आईचे विश्व, देव शोधतो आहे. अशोक जाधव यांनी नामाचे महत्व, भाकरी फिरवली. उमा लुकडे यांनी पिता माय माऊली. शांतीलाल ननवरे यांनी कोसळत्या जलधारा, प्रेमाच्या आठवणी. सीताराम नरके यांनी वारकरी बाप माझा, आपल्या या जीवनाला रंग सख्खे देऊ नवा. कांचन मुन यांनी संतांचे विचार. आनंद गायकवाड यांनी ओठात माझ्या जिचे नाव आहे. विनोद अष्टुळ यांनी वारकरी भक्ती रसाची, पावसातील पक्षी. रोहिदास बिचुकले यांनी अभंग,पांडुरंग. चंद्रकांत जोगदंड यांनी पहाटेच्या पारी. जगदीप वनशीव यांनी मी माझ्या एकांताशी बोलतो. दिव्या आठवले, वंदना बरडे, अंजली चिंचाणे, सुनील साबणे यांनी अभंग व महादेव गीत आणि सुवर्णा पवार यांनी ऐकुन होते वारी वारी अशा बहारदार दोन-दोन कवितांनी आषाढी एकादशी ही काव्य सुमनाने फुलून आली.
कार्यक्रमाची प्रस्तावना संस्थेचे संस्थापक विनोद अष्टुळ यांनी प्रस्तावना, दिलखुलास निवेदन जगदीप वनशिव आणि आभार उध्दव महाजन यांनी व्यक्त केले.
× How can I help you?