मागील तीन वर्षांपासून मेट्रो आणि उड्डाणपुलाच्या कामामुळे एसएनडीटी कॉलेज समोरील बस स्टॉप नव्हता अनेक नागरिक व विद्यार्थिनींना बस पकडण्यासाठी अर्धा किलोमीटर पौड फाटा या ठिकाणी जावे लागत होते. वारजे ला बस प्रवास करायचा असेल तर दशभुजा गणपती मंदिरानंतर यात्री हॉटेल पर्यंत पायी जावे लागत होते, ज्यांना पौड ला जायचे आहे त्यांना सलग उड्डाणपुलाच्या आधी सोनल हॉल पर्यंत पायी जावे लागत होते. जवळपास दररोज नागरिकांना व विद्यार्थ्यांना सकाळ संध्याकाळ एक किलोमीटर चालावे लागत होते.