अत्याचार झाल्यावर भेटी देणारे अनेक पण उध्वस्त कुटुंबांचे पुनर्वसन करणारा एकच नेता वैभव गिते आहे…..ऍड.बी.जी. बनसोडे (जेष्ठ विधिज्ञ)

राज्यात जानेवारी 2012 ते डिसेंबर 2022 पर्यंत 632 खून झाले असून त्यापैकी अहमदनगर जिल्ह्यात अनुसूचित जाती बौद्ध,मातंग,चर्मकार,दलित आदिवासिंचे 42 खून झाले आहेत.
अत्याचार पीडित कुटुंबांचे पुनर्वसन करण्यासाठी नॅशनल दलित मुव्हमेंट फॉर जस्टीस (एन.डी.एम.जे) संघटनेचे राज्य सचिव वैभव गिते यांनी एन.डी.एम.जे संघटनेचे राज्य महासचिव ऍड.डॉ.केवल उके यांच्या मार्गदर्शनाखाली मंत्रालयीन व विभागीय खडतर पाठपुरावा केला यासाठी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचे सचिव सुमंत भांगे,डॉ.प्रशांत नारनवरे आयुक्त समाजकल्याण पुणे,राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोग पुणे,यांच्याकडे निवेदन देऊन पाठपुरावा केला.व शासनाला प्रशासनाला मंत्रालयात घुसून आंदोलन करण्याचा शेवटचा इशारा दिला होता.अखेर हे सर्व प्रयत्न यशस्वी झाले.अहमदनगर जिल्हाधिकारी सिद्धराम सालीमठ्ठ व सहाय्यक आयुक्त राधाकिसन देवडे यांनी एकाच वेळी तीन कुटुंबियांना शासकीय नोकरी देण्याचे आदेश दिले.यामध्ये राहुल संतोष साळवे व भागीनाथ राजेंद्र धिवर यांना सार्वजनिक बांधकाम विभासगत तर संकेत नामदेव सोनवणे यास जिल्हा परिषद येथे वर्ग 4 या पदावर नोकरी देण्यात आली आहे.यापूर्वी झालेल्या खून प्रकरणात शासकीय नोकरी देण्याची कार्यवाही सुरू आहे.
दलित आदिवासींच्यावर अत्याचार झाल्यावर भेटी देऊन भाषणे करणारे अनेक नेते आहेत परंतु स्वतःचा जीव धोक्यात घालून जातीय अत्याचारात उध्वस्त झालेल्या कुटुंबांचे पुनर्वसन करणारा एकच नेता वैभव गिते आहे.
असे उद्गार जेष्ठ विधीज्ञ बी.जी. बनसोडे यांनी काढले.
तीन खून प्रकरणात शासकीय नोकरी देणाऱ्या अहमदनगर जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ्ठ व सहाय्यक आयुक्त राधाकिसन देवडे यांचे आभार ऍड.डॉ.केवल उके यांनी मानले आहेत.
यापूर्वीही ऍड.डॉ.केवल उके यांच्या मार्गदर्शनात वैभव गिते यांनी पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यातील चंद्रकांत गायकवाड खून प्रकरण,माळशिरस तालुक्यातील संजय दनाने खून प्रकरण,जामखेड तालुक्यातील नितीन आगे खून प्रकरण,शिर्डी मधील सागर शेजवळ खून प्रकरण,पिंपरी चिंचवड मधील माणिक उदागे खून प्रकरण,नांदेड मधील संतोष भालके खून प्रकरण,कल्याण मधील विशाल पगारे खून प्रकरणात तसेच सातारा,कोल्हापूर, जिल्ह्यात त्यांच्या वारसांना शासकीय नोकरी मिळवून देऊन पुनर्वसन केले आहे.महाराष्ट्रातील 632 खून प्रकरणात सर्व कुटुंबांचे पुनर्वसन करण्याची घोषणा वैभव गिते यांनी दलित पँथरच्या वर्धापनदिनी केली होती.याची सर्व पाठपुरावा करीत असताना राज्य सहसचिव पी.एस.खंदारे,राज्य कोषाध्यक्ष शिवराम दादा कंबळे,राज्य संघटक पंचशीला कुंभारकर,राज्य समन्वयक बी.पी.लांडगे,राज्य निरीक्षक दिलीप आदमाणे,राज्य प्रसिद्धी प्रमुख प्रमोद शिंदे यांनी सुरेख साथ दिली.अंमलबजावणी सुरू आहे.

हा सर्व पाठपुरावा करीत असताना राज्य सहसचिव पी.एस.खंदारे,राज्य कोषाध्यक्ष शिवराम दादा कंबळे,राज्य संघटक पंचशीला कुंभारकर,राज्य समन्वयक बी.पी.लांडगे,राज्य निरीक्षक दिलीप आदमाणे,राज्य प्रसिद्धी प्रमुख प्रमोद शिंदे यांनी सुरेख साथ दिली.

Recent Post

× How can I help you?