जागतिक पर्यावरण दिनानिमित्त भाजपा सांस्कृतिक प्रकोष्ठ व स्लिंग फ्लेक्सी प्रा लि कंपनीच्या वतीने ५१वृक्ष झाडे लावुन पोशन करण्याचा संकल्प – वेदांग महाजन.

पुणे/वडगाव मावळ – ५जुन २०२३जागतिक पर्यावरण दिनानिमित्त भारतीय जनता पार्टी सांस्कृतिक प्रकोष्ट व स्लिंग फ्लेक्सी प्रा लि कंपनीच्या वतीने कान्हे या ठिकाणी वृक्षारोपण करण्यात आले.

या प्रसंगी भारतीय जनता पार्टी सांस्कृतिक प्रकोष्ठ महाराष्ट्र राज्य प्रदेश संघटक वेदांग महाजन यांनी वृक्षारोपणचे फायदे समजावून सांगितले करोणा कालखंडात ऑक्सीजन अभावी अनेक कोरोना बाधित रुग्णांना आपले प्राण गमवावे लागले आहे, आपल्या अवतीभवती वातावरण स्वच्छ व सुंदर राहण्यासाठी प्रत्येक व्यक्तीने एक झाड लावले पाहिजे असे मत वेदांग महाजन यांनी मांडले.

यावेळी भारतीय जनता पार्टी सांस्कृतिक प्रकोष्ठ प्रदेश संघटक वेदांग महाजन, स्लिंग फ्लेक्सी प्रा लि कंपनीचे सी एम डी हृषीकेश महाजन ऋषिकेश , एच. आर हेड मृण्मयी महाजन,अमित तळखंदकर,अचल पवार, विशाल लाखपुरकर,राजु लोखंडे, भिमाशंकर पाटील, सत्यवान वाळुंज,ललीत यादव,भटोही यादव,मधुकर मालपोटे आदी उपस्थित होते.

× How can I help you?