आळंदीत गुरु पूजन उत्साहात ; महाप्रसाद अन्नदान वाटप
गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुर्गुरुर्देवो महेश्वरः। गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः।।
दत्तपादुकां पालखीची मिरवणूक

आळंदी ( मल्हार भाऊ काळे) : येथील महर्षि वेदव्यास प्रतिष्ठानच्या वतीने गुरुपौर्णिमेचा उत्सव अत्यंत उत्साही आनंदात प.पु. स्वामी गोविंददेव गिरिजी महाराजांच्या सान्निध्यात वेदश्री तपोवन वेदपाठशाळे दोन दिवशीय उपक्रमांनी साजरा झाला. यावेळी राज्यातील शिष्य परिवाराने आळंदीसह पंचक्रोशीतील वेदपाठशाळे गर्दी केली.

महर्षि वेदव्यास प्रतिष्ठानच्या वतीने सालाबाद प्रमाणे या वर्षीही दोन दिवस गुरु पौर्णिमा उत्सवाचे आयोजन विविध कार्यक्रमांनी करण्यात आले. पहिल्या दिवशी गुलाब गौरव या ग्रंथाचे पारायण तसेच विजयाताई गोडबोले यांची भजन संध्या आणि परमपूज्य स्वामीजींचे पाद्यपूजन करण्यात आले. दुसऱ्या दिवशी पहाटे ज्ञानेश्वर माऊलींचे पूजन तसेच वेदश्री तपोवन वर स्थापित असलेल्या गिरनारच्या दत्त पादुकांना अभिषेक करण्यात आला.

त्यानंतर वेदश्री तपोवन परिसरात दत्तपादुकांच्या पालखीची मिरवणूक काढण्यात आली. सकाळ पासून सुरू असलेल्या व्यासपूजन.हवनाची सांगता पूर्णाहुतीने करण्यात आली. महर्षि वेदव्यासांचे पूजन स्वामिजींद्वारे तीन तारखेला सकाळी नऊ ते बाराच्या दरम्यान झाले. स्वामीजींच्या आशीर्वचनाने या संपूर्ण कार्यक्रमाची सांगता झाली. प्रतिष्ठान द्वारे गुरुपौर्णिमेचा उत्सव विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला. यावेळी मुख्य अतिथी प्रकाश पाटील होते.
आळंदी भर्तरी आश्रमात गुरुपूजन उत्साहात
आळंदी येथील भर्तरी आश्रमात प.पु. गुरु श्री श्री १०८ योगी तेजनाथजी महाराज गुरु पौर्णिमेचा कार्यक्रम उत्साहात साजरा झाला. यावेळी भजन, प्रवचन, गुरुपूजन आणि महाप्रसाद वाटप उत्साहात झाले. यावेळी गुरुपूजन करीत गुरुशिष्य परंपरा जतन करण्यात आली. मनमोहन सिंह कोचर, गौरवशेठ पुरी अनंत दूध डेअरीचे अध्यक्ष नानासाहेब थोपटे, शिवसेना नेते उत्तमराव गोगावले, रवीशेठ थोपटे, मल्हार भाऊ काळे, भाजपचे पिंपरी चिंचवड शहर उपाध्यक्ष किसन बावकर, माजी नगरसेवक किसन महाराज तापकीर, गोलेगाव सोसायटी चेअरमन पै. बाळासाहेब चौधरी, आळंदी जनहित फाउंडेशनचे कार्याध्यक्ष अर्जुन मेदनकर, माऊली शेखर यांचेसह नाथ संप्रदाय भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.

× How can I help you?