गुरूपौर्णिमा निमित्य प्रभागातील गुरूजनाचा सन्मान

मानवी जीवनातला अंधःकार नष्ट करून प्रकाशाची वाट दाखवतो तो गुरू भारतीयांच्या जीवनात गुरुचे स्थान हे सर्वोच्च असल्याचं मानलं जातं. एखाद्या मातीच्या गोळ्याला आकार द्यावा अशा पद्धतीने गुरु आपल्या विद्यार्थ्याच्या जीवनाला आकार देण्याचा प्रयत्न करतो.

त्यामुळे गुरुचे आभार मानण्यासाठी म्हणून भारतीय जनता पार्टी पर्वती मतदार संघ व एकता सेवा प्रतिष्ठानाचे अध्यक्ष गणेश शेरला यांच्या वतीने गुरुपौर्णिमेचे औचित्य साधून प्रभागातील अकरा ऋषीतुल्य गुरुजनांचा घरी जाऊन यतोचित सन्मान करण्यात आला. यावेळी प्रतिष्ठाणचे पदाधिकारी महेश सांळुखे,नझीर शेख,व गणेश शिवशरण उपस्थित होते
× How can I help you?