पुण्यामध्ये एका तरुणीवर झालेल्या कोयता हल्ल्यामध्ये मुलीचे प्राण वाचवणारे निर्भिड तरुण लेशपाल जवळगे यांचा कौतुक सोहळा आज आम आदमी पार्टी पुणे शहर च्या वतीने आयोजित करण्यात आला होता. यावेळी पुष्पगुच्छ व अकरा हजार रुपये कौतुक सन्मान राशी आम आदमी पार्टी तर्फे लेशपाल यांना प्रदान करण्यात आली.
यावेळी लेशपाल जवळगे यांनी दाखवलेल्या असामान्य कर्तबगारीचे आम आदमी पार्टीच्या सर्व कार्यकर्त्यांकडून कौतुक करण्यात आले.समाजातल्या प्रत्येक तरुणाने लेशपाल यांचा आदर्श घ्यावा व लेशपाल ही आता व्यक्ती नसून संस्था झाली आहे अशी भावना आम आदमी पार्टीचे पुणे शहर कार्याध्यक्ष विजय कुंभार यांनी व्यक्त केली.