अक्षय भालेराव खून प्रकरणात विशेष सरकारी वकिलांची नियुक्ती करण्यासाठी नॅशनल दलीत मुव्हमेंट फॉर जस्टिस या संघटनेचे राज्य महासचिव डॉ.केवल उके यांच्या मार्गर्शनात राज्य सचिव वैभव गिते,राज्य विधी सल्लागार एडवोकेट अनिल कांबळे,राज्य सहसचिव पी.एस.खंदारे,राज्य संघटक पंचशीला कुंभारकर,मुंबई ठाणे प्रदेश अध्यक्ष बंदिश सोनवणे,सचिव शशिकांत खंडागळे यांनी मांत्रालयात गृह विभागाचे प्रधान सचिव यांना भेटून चर्चा करून निवेदन सादर केले.निवेदनाची गंभीर व तात्काळ दखल घेत शासनाच्या गृहविभागाने पोलीस महासचालकांना व पोलीस अधीक्षक नांदेड यांना खालील मुद्यांवर अहवाल मागितला आहे.
महाराष्ट्र विधिविषयक कामकाज नियमावली 1984 च्या प्रकरण -3 मधील नियम 18 नुसार छाननी करून खालील मुद्द्यांवरील तपशीलवार माहिती योग्य त्या कारणमीमांसेसह खालील रकान्यात भरून शासनास तात्काळ सादर करावी