दलित पँथर 51 वा वर्धापन दिन साजरा

मुंबई :दलित शोषित पीडित यांना न्याय देणार दलित पॅंथरच्या 51 वा वर्धापन दिनानिमित्त मुंबई येथे यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान सभागृहामध्ये महाराष्ट्र राज्याचे उत्पादक शुल्क मंत्री शंभुराजे देसाई हे बोलत होते कार्यक्रमाची सुरुवात दलित पॅंथर चे संस्थापक पद्मश्री नामदेव ढसाळ यांच्या प्रतिमेस मंत्री शंभूराजे देसाई यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून त्यांना विनम्र अभिवादन करण्यात आले.

यावेळी यावेळी विविध क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय काम करणाऱ्या व्यक्तींचा सन्मान मंत्री शंभुराजे देसाई यांच्या हस्ते स्मृतिचिन्ह शॉल पुष्पगुच्छ देऊन करण्यात आले सभागृहामध्ये महाराष्ट्र राज्यातून आलेले दलित पॅंथरचे कार्यकर्ते व पदाधिकारी यांना मार्गदर्शन करताना म्हणाले स्वर्गीय शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या खांद्याला खांदा लावून काम करण्याचा निर्णय पद्मश्री नामदेव ढसाळ यांनी घेतला होता सरकार म्हटलं तर तुम्हाला सहकार्य लागणार आहे ते करण्यासाठी आम्ही वचनबद्ध आहोत तुम्ही विचार घेऊन चाललात ते स्वर्गीय नामदेव ढसाळ यांचे आणि आम्ही जे विचार घेऊन चालत आहो ते वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या विचार घेऊन चालत आहोत सरकार तुमचा आहे दलित शोषित पीडित यांना आम्ही न्याय देणार त्यांच्या शिक्षणाकडेही आमचा सरकारचा लक्ष आहे असे यावेळी मंत्री शंभूराजे देसाई यांनी सांगितले या कार्यक्रमाचे आयोजन दलित पॅंथर महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष सुखदेव सोनवणे यांनी केले

यावेळी दलित पॅंथर महाराष्ट्र राज्याचे विद्यार्थी आघाडीचे अध्यक्ष शुभम सोनवणे पुणे शहर अध्यक्ष प्रकाश साळवे ज्येष्ठ पॅंथर नेते विठ्ठल केदारी पुणे शहर युवक अध्यक्ष राजेश गाय गवळी राहुल सोनवणे विक्रम कांबळे सिद्धेश्वर घोलप पुणे जिल्हा महिला आघाडी अध्यक्ष सोनाली धनगव पिंपरी चिंचवड शहर अध्यक्ष शितल रोकडे उज्वला भोसले शालिनी चांदणे अनिता नाईक नवरे सुरेखा गायकवाड सुकन्या मोरे विनिता मिरेकर रुबीना शेख भावना गायकवाड करुणा ललुसे शिवानी उकरले अंजली धुमाळ आरती सोंडे सिद्धार्थ दाभाडे अरविंद गायकवाड विजय तालरे संतोष भोसले आधी यावेळी उपस्थित होते

× How can I help you?