कोमरझोन रस्त्यावरील वजड वाहतूक डायव्हर्ट करावी, सी. सी.टी.व्ही.सहित इतर मागण्याचे निवेदन

येरवडा -कॉमरझोन समोरील रस्ता येथे मोठ्या प्रमाणात अपघात होत असतात त्या रोड वर सि.सि. टी.व्ही.कॅमेरा, वाहणांचे स्पीड कंट्रोल करणे करीता व ट्राफिक कंट्रोल करणे करीता उपाययोजना करावी अशा मागणीचे निवेदन साम्राज्य प्रतिष्ठानच्या वतीने देण्यात आले.

O9 तारखेला बैठी चाळ येथील तरुण युवक परेश गलियल याचा रस्त्यात पडला आणि त्याचा डोक्यावरून अवजड वाहन गेले व त्याचा जागीच मृत्यू झाला ते कोणते वाहन होते त्याचा कळण्यास मार्ग नाही म्हणून प्रशासनाने याकडे लक्ष द्यावे अन्यथा आंदोलनाचा इशारा देण्यात आला.
याच रस्त्यावर येरवडा जेल,मेंटल हॉस्पिटल,कोमर झोन आय. टी.कंपनी तशेच लोकवस्ती असल्यामुळे सुरक्षेचा प्रश्न निर्माण होतो त्याच अनुषंगाने या सर्व रस्त्यावरील अवजड वाहतूक ही डायवर्ट करावी जेणे करून कोणताही अपघात होणार नाही या मागणी करीता साम्राज्य प्रतिष्ठान अध्यक्ष महेशदादा पाटील यांनी वाहतूक विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शैलेश शंखे यांची भेट घेतली व पत्र देऊन मागणी केली.

Recent Post

× How can I help you?