त्याच वय १६ वर्ष, सोशल मीडिया वापरायला बंदी केली म्हणून त्याने आत्महत्या केली, वय वर्ष १४ पबजी खेळण्यासाठी मोबाईल नाही दिला म्हणून आईला मारलं, ऑनलाईन रमीमध्ये पैसे गमावले म्हणू तरुणणे जीवन संपवले, युट्युबच्या वाढत्या वापरामुळे पहाटे ३ पर्यंत मुलं जागी राहतात, अवघी ३-४ वर्षाची मुलं कार्टून लावून नाही दिल तर जेवत नाही हि प्रातिनिधिक उदाहरण असली तरी आज हि पालकांसाठी चिंतेची बाबा ठरू लागली आहे.
लॉकडाउन काळात झालेलं ऑनलाईन शिक्षण त्यामुळे अगदी लहान वयात हातात आलेला मोबाईल यामुळे आज घर घरात अशी उदाहरण सर्रास आढळतात.