पुणे :एवढ्या लवकर सोडून जाशील असे वाटले नाही मित्रा. तुझे एवढ्या लवकर जाणे मनाला पटत नाही जीवाला जीव लावणारा मित्र कुठे शोधायचा….. कुठे शोधायचा तो हसरा चेहरा…… कुठे शोधायचे ते दिलखुलास व्यक्तिमत्तव…. शालेय आणि युवा अवस्थेतील दिलदार मित्र सदैव गरजूवंतांच्या मदतीला धावून जाणारा. खेळाडू वृत्तीने मिश्किली करणारा, आमच्या गळ्यातील ताईत मैत्रीच्या दुनियेतील राजा माणूस असंख्य मित्र असलेला मैत्री जपणारा चुकल्यास जागेवरच फाटकविणारा कोणाची हि तमा न बाळगता मैत्री जागविणारा हा अवलिया कलाकार आम्हा सर्व मित्रांना पोरका करून गेला न परतणाऱ्या वाटेवर….. एवढ्या लवकर जाशील असे वाटले नाही अशोक …
खडकीतील आलेगावकर मध्ये शिकलेला हा आमचा मित्र आपल्या कर्तृत्वाच्या बळावर आज प्रयन्त यशस्वी मजल मारतो यातच सारे काही आले…..