लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंचे कार्यकर्तृत्व इंग्रजी,हिंदी,मराठी,तेलगू,कन्नड,गुजराती,ओडिया,भाषेत प्रा.डॉ.कोरडे लिखित

उत्तर प्रदेश,मध्यप्रदेश,बिहार,दिल्ली,हिमाचल प्रदेश, हरियाना,छत्तीसगड,झारखंड,उत्तराखंड,राजस्थान तशेच इतर राज्यात अण्णाभाऊंचे कार्यकर्तृत्व पोहचणे झाले शक्य*

क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या इंग्रजी विभागाचे प्राध्यापक व माजी विभागप्रमुख डॉ. बजरंग कोरडे यांनी मुळात इंग्रजीतून लिहिलेल्या व दिल्लीच्या साहित्य अकादमीने प्रसिध्द केलेल्या लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्यावरील पुस्तकाचे राष्ट्रभाषा हिंदीत भाषांतर झाले आहे. हे भाषांतरही साहित्य अकादमीनेच प्रसिध्द केले आहे. हिंदी भाषेतल्या या पुस्तकाचा ISBN क्रमांक ९७८- ९३-५५४८-४४०-६ असा आहे. हे हिंदी भाषांतर दिल्ली विश्वविद्यालयाच्या ऑरोबिंदो महाविद्यालयाच्या इंग्रजी विभागातील प्रा.डॉ.राजकुमार वर्मा यांनी केले आहे.
हिंदी भाषेत हे पुस्तक भाषांतरित झाल्यामुळे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या कर्तृत्वाची व नावाची नोंद भारतातल्या हिंदी भाषिक पट्ट्यातील राज्यांमध्ये पोचणे सोपे होईल. हिंदी भाषिक पट्ट्यात प्रामुख्याने उत्तर प्रदेश, मध्यप्रदेश, बिहार, दिल्ली, हिमाचल प्रदेश, हरियाना, छत्तीसगड, झारखंड, उत्तराखंड व राजस्थान ही दहा राज्ये येतात. त्या व्यतिरिक्त भारतातील इतर राज्यांतील हिंदी भाषिकांपर्यंतही अण्णा भाऊंच्या कार्यकर्तृत्वाची व व्यक्तिमत्वाची माहिती / ओळख पोचणे हिंदी भाषांतरामुळे शक्य होणार आहे.डॉ. कोरडे यांच्या या पुस्तकाचे हे सहाव्या भारतीय भाषेतले भाषांतर आहे.
यापूर्वी हे पुस्तक तेलगू, कन्नड, गुजराती, मराठी व ओडिया या भाषांत भाषांतरित झालेले आहे. डॉ. कोरडे यांचे इंग्रजीतले हे पुस्तक १९९९ साली जेव्हा पहिल्यांदा प्रकाशित झाले तेव्हा ते अण्णा भाऊंवरील एकमेव इंग्रजी पुस्तक होते. त्यापूर्वी कुणीही अण्णा भाऊंवर इंग्रजीतून काहीही लिहिलेले नव्हते.अशी माहिती डॉ. कोरडे यांनी दिली.
× How can I help you?