श्रीरामकृष्ण वारकरी शिक्षण संस्थेमध्ये श्री संत नामदेव महाराज यांची पुण्यतिथी साजरी.

आळंदी :सर्व समाजाने सर्व संतांच्या पुण्यतिथी साजरी करणे या उपक्रमांतर्गत नामदेवरायांच्या पुण्यतिथी निमित्त माळाई देवी पंचक्रोशी दिंडी या दिंडीचे बहुसंख्य वारकरी आळंदी मध्ये दाखल होऊन श्रीरामकृष्ण वारकरी शिक्षण संस्थेमध्ये श्री संत नामदेव महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन विश्वनाथ चोरघे विणेकरी दिनकर रेणुसे,राजाराम चोरगे,विठ्ठल महाराज चोरगे,बाबाजी या मान्यवरांच्या हस्ते श्री संत नामदेव महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार घालण्यात आला

मळाई देवी पंचक्रोशी दिंडी प्रतिवर्षी श्री संत नामदेव महाराजांचे पुण्यतिथी श्री संत ज्ञानेश्वर महाराज मंदिरामध्ये साजरी करीत असते त्यानिमित्ताने श्रीरामकृष्ण वारकरी शिक्षण संस्थेमध्ये सुद्धा प्रतिमेचे पूजन करून वारकरी संप्रदायाच्या नियमाप्रमाणे भजनाच्या जय घोषामध्ये श्री संत नामदेव महाराजांच्या प्रतिमेवर पुष्पवृष्टी करून कार्यक्रम साजरा करण्यात आला त्यानिमित्ताने वारकरी भाविकांना विश्वनाथ चोरगे यांच्याकडून महाप्रसादाचे नियोजन करण्यात आले होते शिक्षण संस्थेचे अध्यक्ष मोहन महाराज शिंदे, रामचंद्र सारंग, रवींद्र कुमकर,सचिन शिंदे, राहुल चव्हाण,कुडले,बाबाजी चोरगे,श्रीरामकृष्ण वारकरी शिक्षण संस्थेचे विद्यार्थी उपस्थित होते.
× How can I help you?