पुणे :नकार पचवता न येणे, शारीरिक आकर्षणाला प्रेम समजणे आणि मुळात एखाद्यावर किंवा एखादीवर प्रेम करणे म्हणजे काय, हेच न समजल्याचे परिणाम म्हणजे एकतर्फी प्रेमातून घडणाऱ्या हिंसा असं प्रतिपादन कल्याणी दुर्गा रवींद्र यांनी केले.
ज्ञानभारती प्रतिष्ठान व अभिव्यक्ती आयोजित प्रेमाचा अधिकार व हिंसेचा प्रश्न या संवादात्मक कार्यक्रमात त्या बोलत होत्या. हा कार्यक्रम शुक्रवार पेठ, नळस्टॉप, बिबवेवाडी परिसरात झाला.आजची जाहिरात, गाणी असो कि चित्रपटातील पटकथा या महिलेला एक माल आहे असंच दाखवतात तसेच मुलगा असो कि मुलगी नाही म्हणण्याचा अधिकार दोघांना आहे व तो समोरच्या समजून घेतला पाहिजे अस अनेकांनी आपले अनुभव किंवा प्रेमभंगातून पुन्हा उभं राहणं असे विविध गोष्टी मांडल्या. पुरुषांना संवेदनशील बनवणे व महिलांना निर्भीड बनवणे अशा पध्द्तीचे विविध उपक्रम सातत्याने राबवत असतो असं उपक्रमाच्या समन्वयिका अलका जोशी म्हणाल्या.
एक लडका और लाडकी सिर्फ “अच्छे दोस्त” बिलकुल हो सकते है, नकाराचा स्वीकार करूया निखळ मैत्री जपूया असे पोस्टर पकडून तरुणाईनं कार्यक्रमाच्या शेवटी फोटो काढून आपापल्या सोशल मीडिया प्रोफाइलवर पोस्ट केले.