मोहरम सणाच्या निमित्ताने सुरक्षेच्या दृष्टीने सर्व आवश्यक उपायोजनांसह नियमांचे पालन करून शांततेत साजरा करावा असे आवाहन, पुणे शहर पूर्व विभागाचे अप्पर पोलीस आयुक्त रंजनकुमार शर्मा यांनी केले. मोहरम सणाच्या निमित्ताने येरवडा पोलीस स्टेशन येथे मोहल्ला समिती शांतता समिती व मुस्लिम बांधव यांची संयुक्त बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी मार्गदर्शन करताना अपर पोलीस आयुक्त शर्मा बोलत होते
मोहरम सण साजरा करत असताना पोलीस व इतर विभागांच्या सर्व परवानग्या घेणे आवश्यक आहे. मस्जिद ट्रस्टी यांनी सीसीटीव्ही सह स्वयंसेवक नेमावेत. पंजे,ताबूत, ध्वनिक्षेपक,रोषणाई यासाठीच्या सर्व परवानग्या घेण्यात याव्यात. आक्षेपार्ह फलक, घोषणाबाजी किंवा भाषण करू नये. मा. सर्वोच्च न्यायालय, पोलीस प्रशासन, महापालिका तसेच इतर आवश्यक विभागांच्या नियमांचे पालन करणे बंधनकारक आहे. सर्व नागरिकांच्या सुरक्षेची जबाबदारी आपल्यावरच असून नियमांचे उल्लंघन
करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई होऊ शकते याची देखील माहिती अपर पोलीस आयुक्त यांनी यावेळी उपस्थित यांना दिली.
या बैठकीला परिमंडळ 4चे पोलीस उपायुक्त शशिकांत बोराटे, सहाय्यक पोलीस आयुक्त (येरवडा) संजय पाटील, सहाय्यक पोलीस आयुक्त (खडकी) श्रीमती आरती बनसोडे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळकृष्ण कदम (येरवडा), विलास सोंडे (विमानतळ), दत्तात्रय भापकर (विश्रांतवाडी) यांच्यासह परिमंडळ चार विभागातील शांतता समिती, मोहल्ला कमिटी तसेच मशिदींचे ट्रस्टी व इतर पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.