आळंदी सिद्धबेटात अधिकमास अखंड हरिनाम सप्ताहांस प्रारंभ

भाविकांना ज्ञानदान श्रवणाची पर्वणी
आळंदी ( मल्हारभाऊ काळे ) : येथील आळंदी सिद्धबेट अधिक मास उत्सव समिती, आळंदी जनहित फाउंडेशन, विविध सेवाभावी संस्था, माऊली भक्त वारकरी आणि आळंदी नगरपरिषद यांचे विशेष सहकार्याने आळंदीतील सिध्दबेटात अधिकमास निमित्त अखंड हरिनाम सप्ताह साखळीस हरिनाम गजरात आळंदी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी अंकुश केंद्रे यांचे हस्ते कलश पूजन करीत प्रारंभ करण्यात आला.

या प्रसंगी आळंदी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी अंकुश केंद्रे, महंत ह. भ.प. प्रल्हाद महाराज विघ्ने, हरी कथा निरुपणकार माऊली दास महाराज, योगेश महाराज वाघ, नेचर फाउंडेशनचे अध्यक्ष भागवत काटकर, ज्ञानदीप इंग्लिश मिडीयम स्कुलचे अध्यक्ष वैजिनाथ ठवरे यांचेसह वारकरी भाविक उपस्थित होते. अधिकमास निमित्त अखंड हरिनाम सप्ताहात दैनंदिन कार्यक्रमात काकडा, ज्ञानेश्वरी पारायण, गाथा भजन, हरी कथा निरुपणकार माऊली दास महाराज यांचे सुश्राव्य वाणीतून हरी कथा, हरिपाठ, कीर्तन, भजन, हरिजागर आदी कार्यक्रम होत असल्याचे आळंदी सिद्धबेट अधिक मास उत्सव समिती मुख्य समन्वयक संयोजक अर्जुन मेदनकर यांनी सांगितले. आळंदी सिद्धबेट ध्यान मंदिर सभागृह येथे सुरु झालेल्या अधिक मास कालावधीतील ज्ञानदान यज्ञ सोहळ्यातील धार्मिक कार्यक्रमास उपस्थित राहावे असे आवाहन आळंदी जनहित फाउंडेशनचे अध्यक्ष घुंडरे पाटील यांनी केले आहे.
× How can I help you?