राष्ट्रीय मजदूर संघा तर्फे फिरते E श्रम नोंदणी केंद्र सुरु

असंघटित कामगारांना सामाजिक सुरक्षा योजनांचा लाभ मिळावा तसेच त्यांच्या रोजगारक्षमतेचा अधिक वापर करता यावा यासाठी कामगार संघटनांच्या रेट्यामुळे सरकारला कामगारांचा राष्ट्रीय डेटाबेस तयार करण्यासाठी ई-श्रम पोर्टल विकसित करावे लागले
परंतु हातावर पोट असलेला असंघटित क्षेत्रातील कामगार घटकाला अजूनही E श्रम कार्ड काय आहे, त्याचा लाभ काय मिळतो, या कार्डची गरज आहे या सर्व माहितीचा अभाव असल्याचे निर्दशनास आले. विशेषतः घरकाम करणाऱ्या व एकल महिलांना, स्थलांतरित कामगार, बांधकाम कामगार आणि प्लॅटफॉर्म कामगार यांना मार्गदर्शन व वेळे अभावी सरकारच्या योजना काय आहेत त्याचा लाभ कसा मिळवावा याबाबत माहिती नसल्याचे निर्दशनास आले.

त्यामुळे कामगारांना नोंदणीचा लाभ घेता यावा या उद्देशाने E श्रम नोंदणी फिरते केंद्र सुरु करण्यात आले असं मत राष्ट्रीय मजदूर संघाचे अध्यक्ष सुनील शिंदे यांनी मांडले
स्थानिक भागात घरोघरी तसेच रिक्षा स्टॅन्डवर, दुकानात, मंदिरात अशा विविध सार्वजनिक ठिकाणी जाऊन तेथील असंघटित क्षेत्रातील कामगारांची नोंदणी केली जात आहे. याच बरोबर E श्रम नोंदणी, त्याचे फायदे, अटी, गरज काय आहे याबाबतचे माहिती पत्रकही देण्यात येत आहे. आधार कार्डशी मोबाईल नंबर लिंक नसणे, जर असला तर तो सध्या वापरात नसणे,10-12 वर्ष झाली आधार कार्ड अपडेट नाही, आधार कार्ड व पासबुक वरील नावाची स्पेलिंग एकसारखी नसणे, रक्ताचा गट माहित नसणे अशा विविध प्रकारच्या अडचणी नोंदणी करताना मोठ्या प्रमाणात आढळत आहेत अशी माहिती उपक्रमाचे समन्वयक विशाल बागुल यांनी सांगितले
जून महिन्यापासून आतापर्यंत सोमवार ते शुक्रवार दुपारी 2 ते 5 या वेळेत दांडेकर पूल, दत्तवाडी, लक्ष्मीनगर, अप्पर ओटा, डेक्कन, धनकवडी, कासेवाडी, औंध परिसरात नोंदणी अभियान राबविण्यात आले आहे. या अभियानात घरकाम करणाऱ्या महिला, शिवणकाम, पेंटिंग, रिक्षा चालक, टेम्पो चालक, पथारी, प्लॅटफॉर्म कामगार अशा विविध घटकांचे ई श्रम नोंदणी केली आहे व यासाठी कुठल्याही प्रकारचे शुल्क आकारले जात नाही आहे या उपक्रमाच्या समन्वयात वैशाली कुलकर्णी व श्रीकृष्ण कुलकर्णी यांचाही सहभाग राहिला यासोबतच
अलका कर्वे, उषा तावरे, छाया साळुंके, चंदा दिनकर, सुप्रिया पालखे, मंगल नाईक, शारदा बोकेफोडे, बाळासाहेब पोकळे यांचे स्थानिक पातळीवर सहकार्य लाभले
× How can I help you?