पुणे जिल्हा मागासवर्गीय अनुदानित वस्तीगृह संस्था चालक असोसिएशनची बैठक पार पडली

पुणे :शंकर जोग :अनुदानित वस्तीगृह मरणासन्न अवस्थेत पुणे जिल्हा मागासवर्गीय अनुदानित वस्तीगृह संस्था चालक असोसिएशनची बैठक धनकवडी पुणे येथील क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले प्रशिक्षण सभागृहात विविध महत्त्वाच्या विषयांवर बैठक पार पडली या बैठकीस पुणे जिल्ह्यातून 36 वस्तीगृहां चे चालक उपस्थित होते

या बैठकीमध्ये महाराष्ट्र शासनाला धारेवर धरत इमारत क्षेत्रफळाबाबतचा शासन निर्णयामुळे वस्तीगृहांचे अस्तित्व धोक्यात आले आहे तो रद्द होणे आवश्यक आहे.वस्तीगृह अनुदानामध्ये वाढ करणे,इमारत भाडे अनुदान मोठ्या प्रमाणात थकीत आहे ते मिळावे,वस्तीगृह कर्मचाऱ्यांना आश्रम शाळेतील समकक्ष पदाची वेतनश्रेणी मिळावी,वस्तीगृहातील विद्यार्थ्यांना शासनाकडून गहू डाळ आणि तांदूळ या धान्याचा पुरवठा पूर्वी होत होता आता तो बंद झाला आहे यांचा पुरवठा पुन्हा पूर्ववत सुरू व्हावा, विद्यार्थ्यांना दोन वेळेचे नाश्ता भोजन आरोग्य आणि स्वच्छता यावर खर्च भागवण्यासाठी संस्था चालकांना कसरत करावी लागते आणि अर्थसंकल्प विधिमंडळ अधिवेशनात केवळ 50 टक्के तरतूद केली आहे ती वाढवण्यासाठी आयुक्तांनी पत्र लिहिले आहे बजेट हेड स्वतंत्र करण्याचा मुद्दा महत्त्वाचा आहे तो कसा घेता येईल ते पाहावे लागेल असे अनेक विषयांवर चर्चा करण्यात आली.
यावेळी बैठकीला गजानन महाराज शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष विशाल तांबे,डीसीएम सोसायटी ऑफ इंडियाचे जनरल सेक्रेटरी विशाल शेवाळे,अध्यक्ष गुरुमुख नारंग,सचिव अशोक शहा, खजिनदार शिवाजीराव चाळक,महात्मा ज्योतिबा फुले मागासवर्गीय मुलांचे वस्तीगृहाचे अध्यक्ष डॉ घनश्याम भोसले,सदस्य श्रीकांत मोरे, नितीन पाटील,बशीर तांबोळी, संदिपान कडवळे,सल्लागार राहुल मखरे,उषा वाघ,सुभाष चौधरी,विकास कदम,एस.आर.काळे,लक्ष्मण गारे,आदी उपस्थित होते

Recent Post

× How can I help you?