साहित्य सम्राट पुणे संस्थेकडून माय मराठीच्या सेवेसाठी आणि संवर्धनासाठी अनेक नाविन्यपूर्ण उपक्रम सातत्याने राबविले जातात. यावर्षी संस्थेने सदाबहार सहपरिवार साहित्यिक श्रावण सहल या उपक्रमाचे आयोजन शहीद सुखदेव राजगुरू जन्मस्थान, शंभू महादेव डोंगर, चासकमान धरण आणि सॊमेश्वर मंदिर या ठिकाणी केले होते. दिवसभर निसर्गाच्या सानिध्यात मनसोक्त आनंद घेतल्यानंतर सर्वांनी सोमेश्वराच्या प्रसन्न प्रांगणात घरगुती जेवणाचा यथेच्छ आस्वाद घेतला.