निगडी, प्राधिकरण-(बाबू डिसोजा कुमठेकर प्रतिनिधी)
मंगळवार दि.२५ जुलै २०२३ रोजी स्वातंत्र्यवीर सावरकर मंडळ महिला विभागतर्फे ” विंदा दर्शन” हा कार्यक्रम कॅप्टन कदम सभागृह येथे झाला.
विंदांची सुकन्या सौ. जयश्री काळे यांनी विंदांच्या कवितांचे सादरीकरण केले. भारत मातेच्या प्रतिमा पूजनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली.
सौ. जयश्री काळे यांनी सुप्रसिद्ध कवी “विंदा” म्हणजेच गोविंद विनायक करंदीकर यांनी लिहिलेल्या बाल-गीते, प्रेमगीते आणि स्त्री- जीवनावरील गीते तसेच इतर अनेक प्रकारच्या कविता सादर केल्या. त्यांनी सादर केलेल्या विंदांच्या बालवयातील “शेवटचा लाडू”, स्त्री-जीवनावर आधारित “झपताल”, मुंबईच्या धकाधकीच्या जीवनावर आधारित “तेच ते”, “चुकली दिशा तरी”, “घेता”, निवडणुकीवर आधारित “सब घोडे बारा टक्के” अशा एक ना अनेक प्रकारच्या कविता सादर केल्या.