पुणे :शंकर जोग :सिद्धार्थ मल्टीपर्पज सोसायटी पुणे च्या वतीने पुणे रेल्वे स्टेशन परिसरामध्ये विविध राज्यातून आलेले सुमारे 25 पुरुष व 15 महिला यांचा समावेश असलेल्या भिक्षेकरी यांना संस्थेच्या वतीने त्यांची ओळख पटवून त्यांना आर.पी.एफ. ठाण्यात नेण्यात आले त्यांची वैयक्तिक समस्या जाणून घेतल्या त्यांना त्यांच्या गावी कुटुंबीयांना दूरध्वनीवरून संपर्क करून त्या भिक्षेकरुंना त्यांच्या घरी पाठवून देण्यात आले व ज्या भिक्षेकरुनचे नातेवाईक दोन ते तीन दिवसात येणार असल्याने त्यांना संस्थेच्या सिद्धार्थ मल्टीपर्पज सोसायटीमध्ये चहा नाश्ता जेवण देऊन ठेवण्यात आले.