बार्टी आयोजित करणार लोकशाहीर अण्णाभाऊ साठे साहित्य संमेलन,
राज्यभरातील साहित्यिक कवी विचारवंत अभ्यासक होणार सहभागी

पुणे — दिनांक 28 जुलै प्रतिनिधी:डॉ बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) पुणे संस्थेच्या वतीने साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या 103 व्या जयंतीनिमित्त (वाटेगाव )सांगली आणि पुणे येथे विविध प्रबोधनात्मक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त राज्यस्तरीय साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात येणार असून साहित्य संमेलनाच्या नियोजन कार्यक्रमाची बैठक दिनांक 28 जुलै 2023 रोजी बार्टी, सभाग्रह येथे मा. ओमप्रकाश बकोरिया, आयुक्त समाज कल्याण महाराष्ट्र राज्य यांच्या अध्यक्षतेखाली व मा. सुनिल वारे, महासंचालक बार्टी पुणे यांच्या प्रमुख उपस्थितीत घेण्यात आली

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे राज्यस्तरीय साहित्य संमेलनाचे आयोजक डॉ सत्येंद्रनाथ चव्हाण विभागप्रमुख, प्रकाशन व प्रसिद्धी यांनी हे साहित्य संमेलन यशस्वी होण्यासाठी पुणे शहर मांतग समाजातील विविध क्षेत्रातील मान्यवरांशी चर्चा,सुचना समजुन घेण्यासाठी बैठक आयोजित केली होती या बैठकीत साहित्य संमेलनाचे नियोजन,अध्यक्ष निवड करणे,उद्घाटन मान्यवरांना निमंत्रण देणे,परिसंवाद,चर्चासत्र,ग्रंथ दिंडी,स्मरणिका प्रसिद्ध करणे,साहित्य प्रदर्शन,सांस्कृतिक कार्यक्रम या विषयी पदाधिकाऱ्यांचे मते सूचना जाणून घेण्यात आल्या.या बैठकीला संबोधित करताना समाज कल्याणचे आयुक्त मा ओमप्रकाश बकोरिया म्हणाले की, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी आपल्या साहित्यातून वंचित शोषित समाजाच्या परिस्थितीचे वर्णन करून त्यांनी संघर्ष करण्याची प्रेरणा दिली त्यांच्या नावाने होणाऱ्या या साहित्य संमेलनास राज्य सरकारच्या वतीने निधीची कमतरता पडू देणार नसल्याचे सांगुन साहित्य संमेलन अत्यंत उच्च दर्जाचे नियोजन करावे असे प्रतिपादन केले.
मा सुनिल वारे,महासंचालक बार्टी पुणे यांनी बॅरिस्टर भीमराव आंबेडकर यांच्या वकिली प्रारंभ दिनाचा शताब्दी महोत्सव आंतरराष्ट्रीय पातळीवर बार्टीच्या वतीने साजरा करण्यात येणार असून साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त बार्टी, व सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या वतीने समाज कल्याण चे प्रधान सचिव मा.सुमंत भांगे,समाज कल्याणचे आयुक्त मा.ओमप्रकाश बकोरिया यांच्या मार्गदर्शनाखाली साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे राज्यस्तरीय साहित्य संमेलनात देश व रशियातील अण्णाभाऊ साठे यांचा अभ्यास करणारे साहित्यिक यांना सहभागी करून साहित्य संमेलन यशस्वी करू असे आश्वासित केले.साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे राज्यस्तरीय साहित्य संमेलनाचे आयोजक डॉ.सत्येंद्रनाथ चव्हाण, विभागप्रमुख, प्रकाशन व प्रसिद्धी यांनी मार्गदर्शन करताना म्हणाले,की विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना पाहताना आपणास साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे दिसले पाहिजे तसेच लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना पाहताना डॉ बाबासाहेब आंबेडकर आपणास दिसले पाहिजे डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी महार मांग परिषदा आयोजित करून या दोन्ही समाजाला एकत्र आणण्यासाठी कार्य केले.साहित्य संमेलन हे अण्णाभाऊंच्या महान साहित्यांचे दर्शन घडवणारे व प्रेरणा देणारे ठरेल या साहित्य संमेलनाच्या संबंधी विविध पक्ष संघटना यांनी सुचवलेल्या सूचनाचा आदर करून मा.आयुक्त समाज कल्याण,मा.महासंचालक बार्टी पुणे यांच्या मार्गदर्शनाखाली आपल्या मागण्यांचा वरिष्ठ पातळीवर पत्रव्यवहार करुन उचित निर्णय घेऊ असे सांगून आलेल्या सर्व मान्यवरांचे आभार मानले
याप्रसंगी मा.ओमप्रकाश बकोरिया, आयुक्त समाज कल्याण, मा.सुनिल वारे,महासंचालक बार्टी पुणे,डॉ सत्येंद्रनाथ चव्हाण,आयोजक तथा विभागप्रमुख,श्रीमती इंदिरा अस्वार, निबंधक बार्टी, वृषाली शिंदे ,विभाग प्रमुख संशोधन,माजी गृहराज्यमंत्री रमेश बागवे,ज्येष्ठ नेते भाऊसाहेब सोनवणे,भगवानराव वैराट,रमेश राक्षे,शंकर तडाखे,विजय ढाकले यांच्यासह पुणे शहर मांतग समाजातील विविध पक्ष संघटनाचे पदाधिकारी उपस्थित होते. मातंग समाजातील ज्येष्ठ नेते माजी राज्यमंत्री दिवंगत मधुकर कांबळे यांना आदरांजली वाहण्यात आली.

Recent Post

× How can I help you?