*लोकशाहीर अण्णाभाऊ साठी जयंती निमित्त साहित्य दिंडी चे आयोजन

संयुक्त महाराष्ट्राचा लढा असो की कामगारांच्या कामाचा मोबदला डफावर थाप मारून दिल्लीपर्यंत शोषितांचा आवाज पोहोचवण्याच काम अण्णाभाऊ साठेंनी केलं. आज मणिपूरच्या घटना असो कि महापुरुषांबद्दल केली जाणारी अवमानकारक वाक्य, महागाई, बेरोजगारीचे मुद्दे पाहता आज अण्णाभाऊ असते, तर याविरोधात जोमाने लढले असते. अण्णाभाऊनंतर ही जबाबदारी आपली सर्वांची आहे. अन्याय सहन न करणे, हीच अण्णांना खरी आदरांजली आहे असं परखड मत पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अरविंद शिंदे यांनी केले

निमित होते साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या १०३ व्या जयंतीनिमित्त पं. नेहरू स्टेडियम ब्लॉक, कसबा ब्लॉक कॉंग्रेस कमिटी आणि लोकायत नागरी समिती आयोजित साहित्य दिंडीचे.
हि साहित्य दिंडी ३० जुलै २०२३ रोजी संध्या ५ वा. महात्मा फुले वाडा ते लहुजी वस्ताद तालिमी पर्यंत काढण्यात आली. याप्रसंगी लोकायत नागरी समितीच्या समन्वयिका अ‍ॅड. मोनाली अर्पणा यांनी सांगितले कि समाजातील विषमता दूर होवून वाचनाची आवड निर्माण व्हावी व लॅाकडाउनमुळे मोबाईल मध्ये गुंतलेली आजची पिढीने वाचनाच्या नवचेतनाच्या प्रवाहात याव हा या साहित्यदिंडीचे आयोजनचा मुख्य उद्देश आहे. वस्तीतील विविध चौकात या साहित्य दिंडीचे स्वागत सम्राट अशोक मित्र मंडळ, समता मित्र मंडळ, सावधान मित्र मंडळांनी केले.
या दिंडी दरम्यान अण्णाभाऊंच्या कार्याची माहिती असणार माहिती पत्रकही वाटण्यात आले. अण्णा भाऊंचा इतिहास सर्वांना सांगणार, लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंचा विजय असो अशा घोषणाही या दरम्यान देण्यात आल्या. अण्णाभाऊ साठेंना वंदन त्रिवार जुलमी राजवटी वरती केला पहिला वार या गाण्याने अण्णाभाऊंच्या कार्याला अभिवादन करण्यात आले
पं. नेहरू स्टेडियम ब्लॉकचे अध्यक्ष हेमंत राजभोज यांनी साहित्य दिंडीचे प्रास्ताविक केले तर कसबा ब्लॉक कॉंग्रेस कमिटीचे अध्यक्ष अक्षय माने यांनी आभार मानले. दिंडीचा समारोप करताना सर्वानी शेवटी छातीवर हात ठेवून संकल्प केला कि मी अण्णाभाऊंचा वारसदार यंदा अण्णाभाऊ साठेंची जयंती किमान एक तरी पुस्तक वाचून साजरी करणार व कमीत कमी ५ मित्रांना अण्णाभाऊंची माहिती पोहोचवणार
यावेळी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी अविनाश बागवे, कमल व्यवहारे, अजित दरेकर, रमेश सोनकांबळे, रवी ननावरे, वाल्मिकी जगताप, अजित जाधव, विकी खन्ना व लोकायतचे स्वप्नील फुसे, कल्याणी दुर्गा उपस्थित होते. या उपक्रमासोबतच महिला मोहल्ला कमिटी, गुलटेकडी व लोकायत नागरी समितीच्या वतीने मीनाताई ठाकरे वसाहतीत अण्णाभाऊ साठेंच्या विचारांचं स्टिकर घरोघरी, गाड्यांवर व दुकानावर लावण्याचं अभियान राबविण्यात आले तसेच लोकायत ऑफिसला अण्णाभाऊ साठेंच्या ‘अकलेची गोष्ट’ या कथेचं वाचन व त्यावर चर्चाही करण्यात आलं सर्व उपक्रमांना तरुणाईचा उस्फुर्त प्रतिसाद लाभला

Recent Post

× How can I help you?