नको जगणे एकाकी खडतर!आनंदाने जगु शोधुन जोडीदार!

पन्नाशी नंतरच्या समस्या ह्या आम्ही आता जाणुन घेतल्या पाहीजे पन्नाशीच्या आत किंवा जवळपास वय असेल तर त्या वयात पर्यंत आपल्या पालकांना आई वडील यांना मुलं काही अंशी संभाळुन घेतात.मुलाची देखील संसारात योग्य मांडणी झालेली नसते किंवा स्थिर स्थावरपणा आलेला नसतो.

मात्र नंतर मुलांच्या संसारात स्थिरस्थावरपणा आल्यावर त्यांना पालक म्हणुन आपले आई वडील नकोसे वाटत असतात दोन पिढीमधील आनंददायी संवाद दुरापास्त होतो.

त्यातले त्यात स्री आई विधवा असेल पुरूष वडील विधुर असतील तर मग त्यांचे एकाकी जगणे हे अत्यंत कठीण होऊन जाते.

मध्यंतरी कोवीडच्या कालावधी मध्ये अनेक महिलांचे पती गेले.अनेक पुरुषांच्या अर्धांगिनी गेल्या.तसेच आज दुर्धर आजार किंवा ह्रदय विकार यांनी देखील अनेक जणानी अकाली मृत्यु येतो.अशा वेळी जगावे लागणारे जिवन म्हणजे एकाकी असते.

आजवर जोडीदारा जवळ बोलत असलेल्या मनातल्या भावना कोणाजवळ बोलता येत नाही.मनाचा कोंडमारा करुन‌ जगावे लागते.त्याच प्रमाणे जगण्याला जे अन्न उर्जा म्हणुन हवे असते ते मिळत तीच भाजी भाकरी वेळेवर मिळत नाही.भुकेची हेळसांड होत असते.

परीणामी माणूस भुसा भरून जनावराच भोत असते तशी ती स्री किंवा पुरुष जगत असतो त्यामुळे आयुमर्यादा कमी होती मनानं शरिरानं माणुस खंगले जातो. एखादा आजार जडलाच तर त्याची वेळीच देखभाल होत नाही.

जगण्याची उमेद असुन हि स्त्रीस किंवा पुरुषास जगता येत नाही.याकडे आता आम्ही मानवाचं जगणं म्हणुन पाहीले पाहिजे

एकाकी जगणाऱ्या स्त्रीने आपला जोडीदार शोधला पाहिजे एकाकी जगणाऱ्या पुरुषाने आपली जोडीदारीन शोधली पाहिजे.समाजाने देखील तसे शोधुन देण्यासाठी पुढे आले पाहीजे

त्यांच्या जगण्यासाठी असणारी बंधने जुने बुरसटलेल्या विचारा पासुन दुर जाऊन उभयतांस जोडीदाराची निवड करुन दिली पाहिजे.समाज,जग काय म्हणेल त्या पेक्षा एकाकी जगण्याच्या यातना काय असतात हे समजुन पुर्नविवाह करुन पुर्नवसन केले पाहिजे.

अशा स्त्रिया अथवा पुरुष असतील त्यांनी माझ्याशी संपर्क साधावा.माझा मोबाईल नंबर ९८५०७६६२३३ टिंगरेनगर विद्यानगर लेन‌ नं६ विश्रांतीवाडी -एअरपोर्ट रोड पुणे

जो पर्यंत एकदुसऱ्याला अनुरूप योग्य जोडीदार मिळत नाही.तोवर हवी तर त्यांची नावं गोपनीय ठेवले जातील आयुष्य सुंदर असते जोडीदारा विना ते एकाकी घालवु नका.हिच यामागे माणुस म्हणुन जगविण्या साठी असणाऱ्या निर्मळ भावना
आण्णा धगाटे जेष्ठ साहित्यिक सामाजिक कार्यकर्ता

× How can I help you?