साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या 103 व्या जयंती निम्मित बोपोडीतील लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती महोत्सव आणि अखिल बोपोडी मातंग युवक संघटनेच्या वतीने समाजातील विविध क्षेत्रात आपला वेगळा ठसा उमटविणारे समाजसेवकांचा सन्मान सोहळा बोपोडी येथील महात्मा फुले हॉल मध्ये मोठ्या जल्लोषात साजरा करण्यात आला.
या वर्षीचा लो.अण्णाभाऊ साठे विशेष प्राविण्य पुरस्कार जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते लेखक मोहन मस्के, क्रीडा प्रशिक्षक पंच प्रा. राजेंद्र मागाडे, पत्रकार निवेदक क्रिकेट पंच दत्ता सूर्यवंशी, कराटे असोसिएशनचे नवोदित खेळाडू घडविणारे सेन्सयू राजू थापा, प्रसिद्ध चित्रकार मनोज निकाळजे, युवा क्रिकेटर राहुल शहा, फोटोग्राफर संदीप भिसे, सॉफ्टवेअर इंजिनिअर अंकित नाईक. इत्यादींचा स्मुर्तिचिन्ह पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला.