आळंदी ( अर्जुन मेदनकर ) :आळंदी जनहित फाऊंडेशन संचलित सिद्धबेट मध्ये अधिकमास निमित्त कीर्तन महोत्सवाची पर्वणी ३ ते ९ ऑगस्ट २०२३ या कालावधीत स्व. दशरथ बालवडकर यांच्या स्मरणार्थ लाभणार आहे. सिद्धबेट आळंदीत एक महिनाभर अधिकमास निमित्त अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. यातील तिसऱ्या सप्ताहात किर्तन महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या पर्वणीचा लाभ भाविक, नागरिकांनी घ्यावा असे आवाहन मोहन महाराज शिंदे यांनी केले आहे.