पुण्यातील विश्रांतवाडी येथे लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांची 103 व्या जयंती निमित्त आरोग्य शिबीर राबवण्यात आले तशेच शाळेतील विद्यार्थ्यांना वह्या देण्यात आल्या आणि संध्याकाळी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे कार्य लोकांपर्यंत पोहचण्यासाठी गीतांच्या माध्यमातून जनजागृती करण्यात आली. छत्रपती शिवाजी महाराज,क्रांती गुरु लहुजी वस्ताद,महात्मा ज्योतिबा फुले,डॉ.बाबासाहेब आंबेडकर,लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांचा आदर्श घेऊन सूर्य तेज प्रतिष्ठान सामाजिक कार्य करत आहे.यावेळी अनेक सामाजिक,राजकीय,शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवरांनी उपास्थिती दिली तशेच नागरिकांचा चांगला प्रतिसाद लाभला या जयंती चे आयोजन सूर्य तेज प्रतिष्ठान, विश्रांतवाडी यांनी केले.