सामाजिक न्याय व समतेचे अग्रदूत व आरक्षण वर्गीकरणाचे अग्रणी स्व. मधुकरराव कांबळे यांनी उपेक्षित वंचित समाज घटकातील विकासात्मक विषमता दूर करणारा सामाजिक न्याय व समतेचा विचार कायम तेवत ठेवणार असे मत दलित महासंघाचे अध्यक्ष मच्छिंद्र सकटे यांनी व्यक्त केले. ते अकोला येथे स्व.मधुकरराव कांबळे यांच्या तेरवी निमित्त आयोजित शोक सभा कार्यक्रमात बोलत होते.या कार्यक्रमाचे अध्यक्ष समाजाचे जेष्ठ सेवक अण्णा धगाटे होते. सदर शोक सभेला संपूर्ण राज्यभरातून कार्यकर्ते उपस्थित होते.