राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पुणे शहर उपाध्यक्षपदी अफजल शेख यांची नियुक्ती

पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटाचे पुणे शहर उपाध्यक्षपदी अफजल शेख यांची नियुक्ती करण्यात आली.नियुक्तीपत्र खासदार सुप्रिया सुळे व खासदार अमोल कोल्हे यांच्या हस्ते देण्यात आले यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पुणे शहराध्यक्ष प्रशांत दादा जगताप व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पुणे कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष चंद्रशेखर धावडे व इतर पदाधिकारी उपस्थित होते.

नियुक्तीपत्र देताना अफजल शेख यांनी सांगितले पुणे शहरामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी वाढवणार शहरामध्ये सभासद नोंदणी अभियान राबवणार तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासोबत राहणार व पुणे शहर अध्यक्ष प्रशांत दादा जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली काम करणार जास्तीत जास्त कार्यकर्त्यांना राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सभासद नोंदणी अभियान राबवणार

Recent Post

× How can I help you?